Jejuri| दुरुस्तीच्या कामासाठी मागील दोन महिने बंद असलेले जेजुरीचे श्री क्षेत्र खंडोबा मंदिर आजपासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे, अशी माहिती मार्तंड देवस्थानचे विश्वस्त पोपटराव खोमणे यांनी दिली आहे. पुरातत्त्व विभागातर्फे मंदिराच्या दुरुस्तीचे व डागडुजीचे काम सुरू आहे. या सर्व कामाची माहिती देण्यासाठी जेजुरी येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
मागील दोन महीने मंदिराच्या गाभाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने दर्शन बंद होते. यामुळे भाविकांची संख्याही कमी झाली होती तसेच अनेकांची गिरसोयही होत होती. त्यामुळे स्थानिक अर्थचक्रावर याचा मोठा परिणाम झाला होता. पण, आता दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर गाभाऱ्याचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यामुळे मंदिर खुले झाले आहे. भाविकांना रविवारपासून गाभाऱ्याच्या उंबऱ्यातून खंडोबाचे दर्शन घेता येणार आहे.
जेजुरीचा ऐतिहासिक खंडोबा गड जतन करण्यासाठी राज्य सरकारतर्फे विकासाची कामे सुरु होती. त्यामुळे गड भाविकांसाठी बंद करण्यात आला होता. पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या सर्व दुरुस्त्या तसेच आणखी काही उपाययोजना करण्यात आल्या. यासाठी सुमारे १०७ कोटी रुपयांचा विकासाचा आराखडा मंजूर झालाअसून, त्यानुसार गडावर विविध विकासकामे वेगाने पूर्ण करुत अखेर गाभारा दर्शनासाठी खुला केला गेला आहे. अखेर मुख्य गाभाऱ्याचे काम पूर्ण झालं आहे. एवढे दिवस गडावर येणाऱ्या भाविकांच्या अभिषेक व महापूजा या पंचलिंग भुलेश्वर ह्या मंदिरात करण्यात येत होत्या.
Lalit Patil case| पोलिसांनी ललित पाटीलला आणलं गुप्तपणे नाशिकला..? नेमकं प्रकरण काय..?
जागृत देवस्थान…
पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे खंडोबाचे देवस्थान आहे. खंडोबा हे अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असून तो नवसाला पावणार जेजुरीचा मल्हारी मार्तंड खंडोबा म्हणून लोकप्रिय आहे. उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार येथे खंडोबाचे जुने स्थान व देऊळ आहे. पण, जेजुरीला गडाच्या पायथ्याशी नव्याने देऊळ बांधले गेले. त्यालाही आता तीन शतकं उलटून गेली आहेत. मराठा, कुणबी, धनगर, आगरी, कोळी तसेच इतरही अनेक समाजांचे हे आराध्यदैवत तसेच कुलदैवत आहे. खंडोबाच्या यात्रा ह्या चैत्र, पौष तसेच माघ या तीन महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा असे पाच दिवस, आणि मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा पासून ते षष्टी असे सहा दिवस, वर्षातील सर्व सोमवती अमावस्या आणि आश्विनी शुद्ध प्रतिपदा ते दशमी अशा दहा दिवस येथे यात्रा असतात.
Maharashtra politics| महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा वारे फिरणार..? उद्या शक्तिप्रदर्शन होणार..?
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम