IND vs AUS : वर्ल्ड कप 2023 मधला पहिला सामना खेळण्याआधीच टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. फॉर्ममध्ये असलेल्या टीमच्या टॉप प्लेयरला डेंग्युची लागण झाली आहे. वर्ल्ड कप 2023 टुर्नामेंटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध अभियान सुरु करण्याआधीच हा टीम इंडियासाठी मोठा हा धक्का आहे.ऑस्ट्रेलिया सारख्या टीम विरुद्ध विजयी सुरुवात झाल्यास संपूर्ण टीमचा आत्मविश्वास वाढेल. परंतु टीम इंडियासाठी वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना खेळण्याआधीच अडथळ्याची शर्यत सुरु झालेली आहे. टीम इंडियाला यातून मार्ग काढावा लागेल. टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिलला डेंग्युची लागण झाली आहे. शुभमन गिलचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. त्यामुळे शुभमन गिलचं ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या सामन्यात खेळणं कठीण दिसतंय. येत्या 8 ऑक्टोबरला चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामना होईल.(IND vs AUS)
Mumbai | गोरेगावात इमारतीला भीषण आग; 3 मुलांसह सात जणांचा मृत्यू
शुभमग गिल टीम इंडियाकडून ओपनिंगला येतो. कॅप्टन रोहित शर्मासोबत त्याने अनेक सामन्यात सलामीवीराची भूमिका बजावली आहे. शुभमन गिल जबरदस्त फॉर्ममध्ये सुद्धा खेळतोय. त्यामुळे जर तो खेळला नाही, तर टीम इंडियाला निश्चितच त्याचा फटका बसणार आहे. आज शुभमन गिलची आणखी एक टेस्ट होणार असल्याची माहिती आहे, त्यानंतर शुभमन गिल खेळणार की नाही? हे स्पष्ट होईल. शुभमग गिलने अलीकडेच 24 सप्टेंबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात दमदार शतक झळकावल होतं. मोहालमीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने 74 धावा केल्या होत्या. शुभमन गिल खेळणार नसेल, तर त्याच्याजागी दुसरा ओपनिंग पार्ट्नर निवडण्याचं आव्हान कॅप्टन रोहित शर्मासमोर असेल.
शुभमन गिलच्या जागी हाच असेल परफेक्ट ऑप्शन
शुभमन गिल खेळला नाही, तर त्याजागी कॅप्टन रोहित शर्मा आणि राहुल द्रविड जोडी इशान किशनची निवड करु शकते. सलामीसाठी टीम इंडियाकडे इशान किशनच्या रुपानेच योग्य पर्याय आहे. केएल राहुल सुद्धा प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे. त्याच्याकडे सुद्धा ओपनिंगला येण्याचा अनुभव आहे. परंतु केएल राहुलला ओपनिंगपेक्षा मीडल ऑर्डरमध्ये खेळायला जास्त आवडतं. सध्या तो मिडल ऑर्डरमध्ये सेट झाला आहे. नुकत्याच झालेल्या आशिया कप आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरीजमध्ये केएल राहुलने मिडल ऑर्डरमध्ये खेळताना चांगल्या धावा केल्या आहे.त्यामुळे कॅप्टन रोहित आणि द्रविड जोडी ऑस्ट्रेलिया विरुद्ध इशान किशनला उतरवू शकते. इशान किशनने फक्त बांग्लादेश विरुद्ध शतक झळकवलं आहे. पण आशिया कपमध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती. मिडल ऑर्डरमध्ये इशान किशनची सरासरी 29 आहे, तेच ओपनर म्हणून 40 ची सरासरी आहे.त्यामुळे शुभमन गिलच्या जागी इशान किशनच परफेक्ट ऑप्शन असेल असं म्हटलं जातंय.