Maharashtra News | दिल्लीमागोमाग लातूरमध्येही वारंवार भूकंपाचे हादरे

0
53

Maharashtra News : काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये झालेल्या भूकंपाची भीती सरली नसतानाच आता महाराष्ट्रातही भुकंपाची दहशत पाहायला मिळत आहे. कारण, लातूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचं वृत्त नुकतंच समोर आलेलं आहे. वारंवार होत असलेल्या भूकंपाने लातूरकर दहशतीत आलेले आहेत. हासोरी आणि उस्तुरी भागात वारंवार भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असल्याने नागरिक भयभीत झाले आहे. यामुळे नागरिकांवर रात्र घराबाहेर काढण्याची वेळ आलेली आहे. 1.6 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. परंतु, सौम्य धक्के सातत्याने बसत असल्याने पाहणी करण्यासाठी नागरिकांनी तलाठी, नायब तहसीलदारांची भेट घेतली आणि भूकंपाचे धक्के सौम्य असले तरी प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी केली आहे. प्रशासकीय पातळीवर नागरिकांच्या जीवितासाठी कोणतीही हालचाल होताना दिसलेली नाही. ज्यानंतर नागरिकांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून संताप व्यक्त केला आहे. (Maharashtra News )

Shivrayancha Chhava | ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाबद्दल मुख्यमंत्र्यांची पोस्ट

दिल्लीतही जाणवलेले भूकंपाचे धक्के 

काही दिवसांपूर्वीच एका डच संस्थेनं पाकिस्तानला इशारा देत तिथं विनाशकारी भूकंप येणार असल्याची शक्यता वर्तवलेली होती. पाकिस्तानच्या सीमेलगत भूगर्भीय हालचाली पाहता ही चिन्हं एखाद्या भूकंपाकडेच खुणावतात असं या इशाऱ्यामध्ये म्हटलं होतं. ज्यामुळं नागरिकांसह यंत्रणांनाही सतर्क करण्यात आली होतं. पाकिस्तानमधील यंत्रणांनी मात्र हा इशारा धुडकावून लावला.

Big News | पाचपेक्षा जास्त व्यक्तींना जमण्यास मनाई; हिंगोलीत प्रतिबंधात्मक

डच संस्थांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतरच भारतातील दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दिल्लीत जाणवलेल्या दोन धक्क्यांपैकी एका धक्क्याची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल इतकी असल्याचं सांगण्यात आलं होतं. नेपाळमध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचं सांगण्यात आलं आहे. तिथे अफगाणिस्तान आणि जम्मू काश्मीरमध्येही यावेळी भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. या घटनेला दोन दिवसही पूर्ण होत नाहीत तोच लातूरमध्ये भुकंप जाणवला. ज्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here