Ola S1 EV : भारतात सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक स्कूटर ओला एस1 सीरीजला चांगला प्रतिसाद मिळालेला.कंपनीने आता एक खास ऑफर आणली आहे.ओला एस1 एअर ही स्कूटर तुम्ही केवळ 20 हजार रुपये डाऊनपेमेंट करुन घरी घेऊन जाऊ शकाल.सध्या इलेक्ट्रिक स्कूटरचे आवड वाढलेले आहे.पेट्रोल मॉडेल घेण्यापूर्वी सुद्धा ग्राहक एकदा इलेक्ट्रिक बाजारात चक्कर मारतोच.अनेकदा चांगल्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याची इच्छा असते पण किंमत पाहिल्यावर अनेक जणांचा बजेट बिघडतो.आता ओला इलेक्ट्रिकने यावर एक उपाय शोधलेला आहे.(Ola S1 EV)
ओला इलेक्ट्रिकच्या एस1 सीरीज अंतर्गत एकूण 4 स्कूटर मिळत आहेत. त्यातील ओला एस1 एअर ही मध्यम बजेट स्कूटर आहे. तिची जोरदार विक्री सध्या सुरु आहे. ओला कंपनीने आता एस1एक्स नावाने स्वस्त स्कूटर पण बाजारात आणलेली आहे.ओलाची स्कूटर (Ola S1 Air Electric Scooter Finance) आता तुम्हाला 20 हजार रुपये डाऊनपेमेंट करुन घरी घेऊन जाता येणार आहे.
Gas Price: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅस सिलेंडरचे दर पुन्हा घसरले
ओला एस1 एअरची किंमत
ओला एस1 एअरची किंमत आणि फीचर्स काय आहेत, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स शोरुम किंमत 1.20 लाख रुपये आहे आणि ऑन रोड किंमत 1,24,412 रुपये इतकी आहे. ही ओला स्कुटर 6 रंगात येते. या स्कूटरमध्ये 3 KWH बॅटरी आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार ही स्कूटर 101 किलोमीटरची रेंज देत आहे.ह्या स्कुटरची बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी चार तास लागतात. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये डिजिटल स्पीडोमीटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, स्पीकर, मल्टीपल ड्राईव्ह मोड, 34 लिटर का स्पेस, फास्ट चार्जिंग, एलईडी लाइट्स आणि 90 kmph ची स्पीडसह अनेक फीचर येतात.
Breaking News |राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर
कर्ज किती मिळेल, किती दिवसांचा हप्ता भरावा लागेल
आता तुम्हाला ओला एस1 एअर इलेक्ट्रिक स्कूटर फायनान्सवर म्हणजे कर्जावर (लोनवर)उपलबध होत आहे. तुम्हाला एक रक्कमी किंमत भरायची नसेल तर एक ऑफर आहे. 20 हजार रुपये डाऊनपेमेंट भरुन ही स्कूटर तुम्हाला फायनान्सवर खरेदी करता येणार आहे. ओला इलेक्ट्रिकच्या वेबसाईटनुसार अनेक बँका ही स्कूटर खरेदी करण्यासाठी जवळपास 7 टक्के दराने कर्ज पुरवठा करणार आहेत. 20 हजार रुपये डाऊनपेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक लाख 5 हजार रुपये पर्यंत कर्ज मिळेल. तीन वर्षांसाठी कर्ज घेत असाल तर त्यासाठी 3225 रुपयांचा हप्ता येईल. पुढील 36 महिने तुम्हाला ईएमआयचा हप्ता भरावा लागेल. या कर्जासाठी तुम्हाला 11,700 रुपये व्याजापोटी द्यावे लागणार आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम