Election | ग्रामपंचायत निवडणुकीचा उडणार धुरळा, मतदानाची तारीख जाहीर

0
69

Election Update | मुंबई :  निवडणूक आयोगाकडून आले महत्त्वाचे अपडेट्स –
राज्यभरातील सुमारे २ हजार ३६९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदांच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ०५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज मुंबईत केली आहे.पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका सतत लांबणीवर पडत असताना ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा लवकरच उडणार आहेत. असे महत्त्वाची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. ग्रामपंचायत सदस्यपदांच्या तसेच सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी मतदान होणार आहे.(Election)

Nashik News |अनिष्ठ तफावतीतील सोसायटींबाबत सकारात्मक निर्णय घेणार…

राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले की, संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दाखल करता येणार आहेत. नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात येईल. नामनिर्देशनपत्रे २५ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येणार आहेत. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. ०५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी ०६ नोव्हेंबर २०२३ रोजी पार पडेल. मात्र गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे ०७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी करण्यात येईल.

World Cup 2023 | उद्यापासून सूुरु होणार वनडे वर्ल्डकपचा थरार
पंचायत समिती जिल्हा परिषदांच्या निवडणुका का रखडल्या आहेत?

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, त्यापूर्वी ९२ नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्याने अनेकांनी त्यावर आक्षेप नोंदवला होता. जाहीर झालेल्या ९२ नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्येही ओबीसी आरक्षण लागू करावे, अशी मागणी असणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. तसेच मविआ काळात तयार करण्यात आलेली वॉर्डरचना बदलण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला होता. या नव्या वॉर्ड रचनेलाही सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्यात आलं आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here