Nashik News : अनिष्ठ तफावतीतील विविध कार्यकारी सोसायट्या अवसायनात काढण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रनाना पगार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने राज्याचे सहकार मंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केलेली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रनाना पगार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने सहकार मंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांची मुंबई येथे जाऊन भेट घेऊन चर्चा केली.त्यावेळी झालेल्या अनिष्ठ तफावतीतील विविध कार्यकारी सोसायटींबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन सहकार मंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले.(Nashik News)
याबाबत शिष्टमंडळाच्या वतीने सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन देण्यात आलेले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, बागलाण तालुक्यातील एकूण ५० संस्था ह्या अनिष्ठ तफावतीत आलेल्या असुन त्यातील ६०% पेक्षा जास्त ऐवढी अनिष्ठ तफावत असलेल्या १० संस्था अवसायनात काढण्याची प्रक्रिया ही शासन स्तरावर चालू झालेली आहे. या संस्था अडचणीत येण्याचे वेगवेगळे कारणं असुन संस्थांवरील कारवाईला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.
Nagpur news | राज्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या हालचाली सूरु
अनिष्ठ तफावतीतील विविध कार्यकारी सोसायटी अवसायानात काढण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. त्यांना स्थगिती देऊन या संस्थाना सुद्धा एक नवीन काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी देखील शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. याला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. लवकरच बैठक घेऊन हा निर्णय घेतला जाईल असे आश्वासन त्यांनी दिलेले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रनाना पगार, विविध कार्यकारी सोसायट्यांचे संचालक सर्वश्री धर्मेंद्र कोर, बाळासाहेब भदाणे, विजय पवार, दिपक शेवाळे, खंडेराव बागुल, उजेंद्र आहिरे, कांतिलाल भामरे, रविंद्र कोर, सुभाष शेवाळे, राजेंद्र आहिरे, संभाजी भामरे, लक्ष्मण कोर, जगन्नाथ गरुड, नंदलाल आहिरे, भाऊराव भामरे, देवदत्त कोर आदिंनी चर्चेत सहभाग घेतला.अनिष्ठ तफावतीतील वि.का.सोसायट्या अवसायनात काढण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी या मागणीचे निवेदन राज्याचे सहकार मंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांना देतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रनाना पगार, धर्मेंद्र कोर, बाळासाहेब भदाणे व शिष्टमंडळ यावेळी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम