Gold Price:मोठी बातमी!सोने 7 महिन्यांच्या नीचांकावर,भाव अजुन कमी होणार

0
44

Gold Price : जागतिक घडामोडी आणि देशांतर्गत बाजारात मागणीत आलेल्या कमीमुळे सोन्याच्या दरात मोठी घसरण दिसत आहे. मौल्यवान धातूच्या किमती सात महिन्याच्या नीचांकी पाळतीवर आपटल्या असून IBJA नुसार देशांतर्गत बाजारात किंमत ५४ हजार ६०० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत घसरू शकतात.(Gold Price)देशभर सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी मंगळवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी पडझड झाली आहे. अमेरिकन डॉलरमधील मजबुती आणि अमेरिकन डॉलर निर्देशांक ११ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्यामुळे देशांतर्गत आणि जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींवर दबाव असून किमती सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आल्या आहेत. या परिस्थितीत सणोत्सवात ग्राहकांना खरेदीवर मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढउतार होत असून किंमतीत घट नोंदवली गेली आहे.

जागतिक बाजारातही सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होऊन दर प्रति औंस $१,८१५ पर्यंत पोहोचले ज्याचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून आला आणि ९९५ प्रति १० ग्रॅम सोने ५६ हजार ४४८ रुपयांवर तर चांदीचा भावही चार टक्के घसरून ६६ हजार रुपयांच्या पातळीवर आला आहे.

Cloud burst | ढगफुटीमुळे अचानक पूर,भारतीय सैन्याचे 23 जवान बेपत्ता
पितृपक्षामुळे सराफा बाजार ठंड; सोन्याच्या भावात प्रतिदहा ग्रॅम इतक्या रुपयांची  झाली घट

सोने आणि चांदीच्या किमतीत आणखी घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.IBJAचे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी सांगितले की, सोन्याचा भाव येत्या काळात भारतीय बाजारात ५४ हजार ६०० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. निधीची व्यवस्था करण्यासाठी अमेरिकेत पॅनिक सेलिंग केले जात आहे, जे थांबले की सोन्याचे भाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत सोने खरेदी करण्याची संधी आहे.

महाराष्ट्रात ‘ऑल इज नॉट वेल’, पडद्यामागून हालचालींना वेग
दुसरीकडे GJCचे अध्यक्ष संयम मेहता म्हणतात की, सोन्याचा भाव प्रति औंस $१७९५ वर जाऊ शकतो. पितृपक्षामुळे सोन्याच्या घसरलेल्या किमती किरकोळ काउंटरवरही चमक दाखवत नाहीत.या परिस्थितीत GJCने दिवाळी कलेक्शन केले, जेणेकरून सोन्याच्या कमी किमती B-2-B मागणी वाढवण्यात यशस्वी होऊ शकते. तसेच अमेरिकन व्याजदर दीर्घकाळ उच्च राहण्याच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर डॉलरची व्यापक मजबूती आणि उच्च कोषागार उत्पन्नामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे भाव सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आपटले असल्याचे केडिया कमोडिटीचे प्रमुख अजय केडिया यांनी म्हटले आहे. अमेरिकन डॉलर निर्देशांक ११ महिन्यांच्या विक्रमी उच्चांकावर चढल्यामुळे सोन्या-चांदीचे दर दबावाखाली आले आहे असे केडिया यांनी मत मांडले आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here