onion rates : नगदी पीक असलेल्या कांद्याने यंदा शेतकऱ्यांना चांगलंच रडवलं आहे. पाच महिन्यांमध्ये कांद्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांना या कांद्याने अक्षरशः मेटाकुटीला आणून सोडलं होतं. या मंदीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानाला देखील सामोरे जावं लागलं आहे.(todays onion rates)
https://thepointnow.in/online-gaming/
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये कांद्याला सर्वात निश्चयांकित दर मिळाला होता दोन ते तीन रुपये प्रतिकिलो प्रमाणे अर्थातच २०० ते ३०० रुपये क्विंटल प्रमाणे कांदा विकला जात असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नव्हता. मात्र हे चित्र आता काहीसं बदलत असल्याचं बघायला मिळत आहे.(todays onion rates)
सध्या कांद्याला जवळपास 1000 ते 1800 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सरासरी भाव मिळत आहे. राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये दोन हजार रुपयांपर्यंत हा भाव पोहोचला असून यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये समाधान पसरल्याचं बघायला मिळत आहे.
राज्यातील विविध भागातील आजचे कांद्याचे दर
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याला उच्चांकी १९८० रुपये प्रतिक्विंटल असा सरासरी भाव मिळाला आहे.
कोल्हापूर (एपीएमसी) बाजार समिती मध्ये कांदाला दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि १४०० रुपये क्विंटल सरासरी भाव मिळाला आहे.(todays onion rates)
खेड चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती : कांद्याला १५०० रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल तर ११०० रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान भाव मिळाला आहे.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती १३६५ रुपये प्रतिक्विंटल कमाल तर ८५० रुपये प्रति क्विंटल सरासरी या दरात आज कांदा विकला गेला आहे.
मुंबई कांदा बटाटा मार्केट १८०० रुपये प्रतिक्विंटल कमांडर १४५० रुपये प्रतिक्विंटल इतका सरासरी भाव आज मुंबई बाजारात मिळाला आहे.(todays onion rates)
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती : मध्ये कांद्याचे दर हे १६०० रुपये प्रतिक्विंटल उच्चांकी तर १५०० रुपये सरासरी भाव मिळाला आहे.(todays onion rates)
कांद्याला आज सर्वोच्च भाव पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला आहे. आज राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या कमल आणि किमान बाजार भावामध्ये थोड्या प्रमाणात घसरण बघायला मिळाली. मात्र, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांद्याला २२७५ रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वाधिक तर १५०० रुपये प्रति क्विंटल सरासरी भाव मिळाला. पिंपळगाव बसवंतचा बाजार वगळता आज राज्यामधील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे.(todays onion rates)
दरम्यान राज्यांमधील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात आज सरासरीपेक्षा काही अंशी घसरण बघायला मिळाली आहे. यामुळे कांद्याचे भाव पुन्हा घसरणार की काय असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम