Dipak kesarkar : त्या वक्तव्यामुळे शिक्षणमंत्री दीपक केसरकर वादाच्या भोवऱ्यात

0
19

Dipak kesarkar ‘ महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विधानावरुन अंधश्रद्धा निर्मुलन समिती आक्रमक झाली असून त्यांनी केसरकर यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.

केसरकर यांचे वादग्रस्त विधान हे सर्वत्र अंधश्रद्धा पोहचविणारे आहे. शिक्षण मंत्र्याने अशा प्रकारे विधान करणे चुकीचे आहे, असे अंनिसने म्हटले आहे.Dipak kesarkar

अंनिसने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी दोन दिवसांपूर्वी  नाशिक येथील  पत्रकार परिषदेत केलेला दावा अंधश्रद्धेचा भाग त्यांच्या वक्तव्याने अंधश्रद्धेला बढावा मिळानार आहे.

https://thepointnow.in/political-crisis-2/

खरं तर, शालेय शिक्षण मंत्री या अतिशय  जबाबदारीच्या संवैधानिक पदावर आरूढ असलेल्या व्यक्तीने असा अवैज्ञानिक,भंपक दावा करणे हे पूर्णतः चुकीचे आहे. शिवाय Dipak kesarkar  राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मूलभूत गाभाघटकात  अंतर्भाव असलेल्या तसेच  मूल्य शिक्षणातही ज्याचा जाणिवपूर्वक  समाविष्ट  करण्यात आलेला आहे  आणि   भारतीय राज्यघटनेमध्ये ५१ क मध्ये शोधक बुद्धी, मानवतावाद आणि वैज्ञानिक दृष्टीकोन याचा अंगिकार, प्रचार आणि प्रसार करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य सांगितलेले आहे,

काय म्हणाले केसरकर

कोल्हापूर येथील पूर परिस्थितीच्या वेळी ते  शिर्डीत होते. तेथे त्यांनी  प्रार्थना केली. त्यामुळे  कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी  धरणाचे दरवाजे उघडले तरीही , पुराच्या पाण्याची पातळी वाढली नाही. धरणाचे दरवाजे उघडले तर पाण्याची पातळी दोन फूट किंवा त्यापेक्षा जास्त वाढते.Dipak kesarkar मात्र केवळ ते शिर्डीत असल्याने धरणाचे दरवाजे उघडले तरीही पाण्याची पातळी वाढली नाही आणि त्यामुळे गावे  पाण्याखाली गेली नाहीत.  पुढे ते असंही म्हणाले की याला अंधश्रद्धा म्हणा, श्रद्धा म्हणा किंवा काहीही म्हणा पण जे घडले ते सर्वांनी पाहिले. असा अजब आणि चमत्कार सदृश्य दावा केसरकर यांनी केला.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here