Bhim amruti din : धुळे येथील लळिंगच्या निसर्गरम्य कुराणात वसलेला लांडोर बंगला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अखंड स्मृती तेवत उभा आहे. या ठिकाणी बाबासाहेब तीन दिवस मुक्कामी होते. दरवर्षी ३१ जुलैला या ठिकाणी ‘भीमस्मृती यात्रा’(bhim smruti yatra) भरविली जाते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समाज व देशासाठी दिलेल्या भरीव योगदानात एक सुवर्णपान खानदेशाच्या वाट्याला आले आहे. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या धुळे- खानदेश भूमीचा स्मृतिगंध आजही दरवळत आहे. जुन्या-नवीन पिढीने आदराने व अभिमानाने जोपासलेला हा अनमोल ठेवा आजही नगरवासीयांना आनंदित, पुलकित करीत आहे. लळिंग किल्ल्यावरील ‘लांडोर’ (Landor Bangla) बंगल्यात बाबासाहेबांचे वास्तव्य, राजेंद्र छात्रालय, राजवाडे संशोधन मंडळाला दिलेली भेट आणि दीनदलितांना दिलेला मौलिक संदेश परिवर्तनवादी वाटसरूला दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणा देत आहे….
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (dr babasaheb ambedkar) यांनी ३१ जुलै १९३७ ला धुळे शहराला भेट दिली होती. बाबासाहेबांचे भव्य स्वागत त्या वेळी करण्यात आले होते. बाबासाहेबांनी लांडोर बंगल्यावर मुक्काम केला होता. त्या स्मृती जपण्यासाठी १९९३ पासून येथे भीमस्मृती यात्रा आयोजित करण्यात येते. यानिमित्त जिल्ह्यासह नंदुरबार, जळगाव, नाशिक, औरंगाबाद तसेच गुजरात व मध्य प्रदेशातूनदेखील नागरिक मोठ्या संख्येने येथे येतात. त्यामुळे मोठा जनसागर उसळतो.
https://thepointnow.in/five-cobra-snake-found-in-house/
१९३७ साली डॉ.बाबासाहेब’ आंबेडकर यांचे ३१ जुलैला पहाटे पाच वाजता धुळे(dhule) चाळीसगाव रेल्वेने आगमन झाले होते. बाबासाहेब येणार असल्याची बातमी ऐकून दलित समाज बांधव मोठ्या संख्येने त्यांचे स्वागत करण्यासाठी एकवटले होते. बाबासाहेबांचे आगमन होताच ‘डॉ.आंबेडकर झिंदाबाद’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता..
न्यायालयाच्या कामासाठी बाबासाहेब धुळ्यात आले होते. त्यामुळे न्यायालय (court)परिसरातही तुफान जनसागर एकवटला होता. अपील संपल्यानंतर त्यांनी बार लायब्ररीला भेट दिली. तेथे काकासाहेब बर्वे यांच्यातर्फे देण्यात आलेले चहापानही त्यांनी घेतले होते. याच दौऱ्यात बाबासाहेबांनी राजवाडे संशोधन मंडळासही भेट दिली होती. त्यानंतर रात्री आठ वाजता मनपा शाळा क्रमांक पाचच्या मैदानात त्यांनी भव्य जाहीर सभा घेतली होती. त्या वेळीदेखील बाबासाहेबांनी लांडोर बंगल्यावर मुक्काम केला होता. त्यामुळे लांडोर बंगल्याला भेट दिल्यावर अजूनही बाबासाहेबांच्या भेटीची आठवण होते, बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या लांडोर बंगल्याच्या ऐतिहासिक स्मृतींना(memories) उजाळा देण्यासाठी आज ३१ जुलै रोजी समाज बांधव मोठ्या संख्येने याठिकाणी एकवटलेले दिसून आले आणि बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करून अभिवादन केले. 31 जुलै निमित्त या ठिकाणी विविध भीम गीत व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत व डॉ.बाबासाहेब आंबेडकर व जय भीम चा नारा देत समाज बांधवांनी यावेळी जल्लोष व्यक्त केला….
दर वर्षांगणिक भीमस्मृती (bhim smruti) यात्रेला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे. राज्यातूनच नव्हे तर नजीकच्या गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांमधूनही अनुयायी मोठ्या संख्येने येताना दिसून येत आहे..
लांडोर बंगला,लळींग किल्ला तसेच धबधबा आपल्या निसर्ग(nature) सौंदर्याने येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला अधिकच आकर्षित करत आहे.दमदार पावसामुळे संपूर्ण कुरण परिसर देखील हिरवाईने नटला असून जणू काही हिरवळीची चादरच पांघरल्याचे चित्र याठिकाणी निर्माण झाले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम