Case against Sambhaji Bhide : अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावतीमध्ये एका सभेत महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आता भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे अध्यक्ष संभाजी भिडे आणि त्यांची वादग्रस्त वक्तव्य हे समीकरण आता काही नवे राहिले नाही. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधीविरोधात वादग्रस्त विधान केलं. ज्यावरून आता काँग्रेस आक्रमक झाली असून राज्यभरात आंदोलने केली जात आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केल्यानंतर आता संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अमरावतीतीत राजापेठ पोलिसांनी कलम १५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संभाजी भिडे यांना अटक करा अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. पुण्यातही काँग्रेसच्या नेत्यांनी भिडेंविरोधात आंदोलन सुरू केलं असून त्यांच्या पुतळ्याला जोडे मारत निषेध व्यक्त केला आहे.
https://thepointnow.in/malkapur-bus-accident/
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने फडके हौद चौक येथे संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येत असून यावेळी कार्यकर्त्यांनी भिडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे कोल्हापुरात सुद्धा भिंडे यांच्याविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेले होते.
दरम्यान, यवतमाळ शहरात संभाजी भिडे यांचे व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तत्पूर्वी शहरात त्यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर फडणाऱ्याना पोलिसांनी ताब्यात घेतले असून शहरात चांगलंच वातावरण तापलं आहे. आंबेडकरवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी भिडे यांच्या व्याख्यानाचे पोस्टर फाडल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद काल विधान परिषदेमध्ये देखील बघायला मिळाले. राष्ट्रपिता म्हणून संबोधल्या जाणाऱ्या महात्मा गांधी यांच्या बद्दल अक्षय कार्य विधान करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता सर्वच स्तरांमधून केली जात आहे. यातच त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढे काय कारवाई करण्यात येईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम