Skip to content

Road Accident : दोन बसेसच्या भीषण अपघात ५ जागीच ठार, २५ जखमी


Road accident : अंबरनाथवरुन हिंगोलीला जाणाऱ्या लक्झरीला बसला विरुद्ध दिशेने भरघाव येत असलेल्या लक्झरी बस ने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार झाले असून २५ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. यातील ५ गंभीर जखमींना बुलढाणा येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

राष्ट्रीय महामार्ग ६ वर मलकापूर जवळ असलेल्या लक्ष्मी नगर मधील रेल्वे उड्डाणपूलावर शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेमुळे संपूर्ण महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

दरम्यान मिळालेल्या माहिती नुसार, हिंगोली येथील खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची लक्सरी बस (क्र‌. ‌एम.एच‌.०८, ९४५८) अंबरनाथवरुन ४० प्रवाशांना घेऊन परतीच्या दिशेने निघाली होती. शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास नागपूरवरुन ही नाशिककडे जात असताना (क्र.एम.एच. २७ बी.एक्स.४४६६) या बसने समोरच्या बसला चालकाच्या बाजूने चिरत नेले

यामुळे समोरासमोर आलेल्या दोन्ही लक्झरी बसेसमध्ये भीषण अपघात झाला व त्यामध्ये हिंगोलीला परतीच्या वाटेवर असलेले ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात २५ जण गंभीर जखमी असून त्यांना येथील जवळील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलविण्यात आले. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावर जाम झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

दरम्यान या घटनेतील गंभीर जखमींवर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ राजेश उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शर्थीचे उपचार केले. मात्र २५ जणांपैकी ५ जण डोक्यात व पोटावर गंभीर जखमा झाल्याने अत्यवस्थ झाले झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तत्काळ बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

https://thepointnow.in/mla-nitin-pawars-petrol-pump-and-office-vendilisam/

दरम्यान या अपघातामध्ये चुकी कुणाची होती. हे जरी समोर आलं नसलं तरी मात्र या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित हानी झाली आहे. तर अनेकजण मरणाशी झुंज देत आहेत. तर आता शासन या अपघाताची दखल घेत मृतांच्या वारसांना आणि जखमींसाठी काय मदत घोषित करणारे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्हा मध्ये अपघातांचा सत्र मोठ्या प्रमाणावर वाढल आहे. या ठिकाणी दिवसागणिक अपघातांची संख्या वाढत असल्याने यावर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. तर या घटनेमुळे पुन्हा एकदा संपूर्ण जिल्हा हादरला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!