Monsoon update : हवामान विभागाने या जिल्ह्यांना दिला सतर्कतेचा इशारा

0
24

Monsoon update : पूर्व किनारपट्टीवरील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भासह राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज कोकण, घाटमाथा, आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला होता. यात ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्यांचा घाटमाथा, विदर्भातील भंडारा, गोंदियामध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे

https://thepointnow.in/eknath-shinde-attacks-uddhav-thackeray/
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा काहीसा दक्षिणेकडे सरकला आहे. Monsson alert राजस्थानच्या जैसलमेर, कोटा, रायसेन, दुर्ग, कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय असलेल्या मॉन्सूनचा आस उत्तरेकडे जाण्याचे संकेत आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून असलेले पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र समुद्र सपाटीपासून ४.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर सक्रिय आहे.

कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात जोरदार पावसाने तडाखा दिला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही संततधार सुरू आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. आज (ता. २८)ठाणे, रायगड, रत्नागिरीसह पुणे, सातारा जिल्ह्यांचा घाटमाथा, विदर्भातील भंडारा, गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. तर उर्वरित विदर्भ, कोकण, कोल्हापूर जिल्ह्यात विजांसह जोरदार पावसाचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.maharashtra alert

बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या ठळक कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता कमी होत असल्याच देखील हवामान विभागाकडून सांगण्यात आले असून उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशा परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून काही किलोमीटर उंचीवरून चक्राकार वारे वाहत आहेत.

या ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा

ठाणे, रायगड, रत्नागिरी, गोंदिया, भंडारा.

जोरदार पाऊस विजांसह पावसाचा इशारा अर्थात येलो अलर्ट

पालघर, सिंधुदुर्ग, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली याठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने पूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक मधील धरण समूह क्षेत्र परिसरात देखील समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे नाशिकच्या चार धरणांमधून आज दुपारच्या सुमारास पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र अद्यापही उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी पुरेसा पाऊस पडत नसल्यामुळे पावसाची प्रतीक्षा कायम आहे. तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. तर ज्या जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्यांनी काळजी घेण्याचा आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here