Viral news ; फ्लाइट टेक ऑफ होणारं नाही कारण ; या कारणामुळे खासदारांनाही नाही जुमानला पायलट

0
19

Pilot’s refusal to take off due to end of duty ; भारतात कधी कोणती विचित्र घटना घडेल, सांगता येत नाही. एअर इंडियाच्या पायलटने विमानाच्या टेक-अॉफची वेळ झालेली असताना ड्युटी संपली आहे, असे सांगून टेक-अॉफसाठी नकार दिला. या विमानात भाजपच्या ३ खासादारांसह शंभर प्रवासी होते. सत्ताधारी पक्षाचे खासदार असल्यामुळे पायलटला चांगलेच धारेवर धरण्यात आले, पण त्याचा काहीही एक परिणाम त्याच्यावर झाला नाही. उलट प्रवाशांनाच पर्यायी व्यवस्था करावी लागली. राजकोटहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात ही घटना घडली.

 

रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास एअर इंडियाच्या विमानात प्रवासी बसत होते. यावेळी वैमानिकाने उड्डाण घेण्यास नकार दिला. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मनस्ताप सहन करावा लागणाऱ्या प्रवाशांमध्ये राजकोटचे भाजप खासदार मोहन कुंडारिया, जामनगरच्या खासदार पूनम मादम आणि नवनिर्वाचित राज्यसभा खासदार केसरीदेवसिंह झाला हे देखील होते. एअर इंडियाच्या वतीने यासंदर्भात कुणीही स्पष्टीकरण दिले नाही. जे उपलब्ध कर्मचारी होते, त्यांनी आपल्याला बोलण्याचा अधिकार नसल्याचे सांगत हात वर केले. त्याचवेळी राजकोट विमानतळाचे संचालक दिगंत बोराह यांनी ही एअरलाईन्सची अंतर्गत समस्या असल्याचे सांगितले.

https://thepointnow.in/the-state-license-of-that-fertilizer-company-was-eventually-revoked/

या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये सामील भाजपच्या खासदारांचा चांगलाच संताप झाला. त्यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधला. ‘ड्युटी संपल्याचे कारण देत वैमानिकाने विमानाचे उड्डाण करण्यास नकार दिल्यानंतर आम्ही दोन तास विमानात बसून होतो. ते टेक-ऑफ म्हणून आम्ही वाट बघत बसलो. याबाबत आम्ही दिल्लीतील अधिकार्‍यांशी संवाद साधला. राजकोट विमानतळावरील या प्रकाराबद्दल तक्रार केली पण काही उपयोग झाला नाही. कारण पायलटने सांगितलं की, ते पुढे उड्डाण करू शकत नाहीत. कारण ते खूप थकले आहेत. अखेरीस, आम्ही रात्री साडेदहाच्या सुमारास विमानातून खाली उतरलो, या शब्दांत भाजप खासदार कुंडारिया यांनी कैफियत मांडली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here