Somayya video update : माझ्याकडे आठ तासांचे व्हीडिओ आहेत ; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा

0
40

Ambadas danve on somayya video : भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली असून आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. अपेक्षेप्रमाणे हा मुद्दा विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही गाजला. या प्रकरणाची सखोल आणि उच्च स्तरावर चौकशी होईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी हा विषय सभागृहात मांडला. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात या प्रकरणी चौकशीची मागणी केली.

माता भगिनींना त्रास देणाऱ्या किरीट सोमय्यांना सरकारं सुरक्षा देणार का? : अंबादास दानवे

विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडीओचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, “काही लोक ईडी सीबीआयच्या माध्यमातून विरोधी पक्षांतील नेत्यांना भीती दाखवतात आणि दुसरीकडे आपल्या केंद्रीय यंत्रणेत ओळखी असून महिलांशी संपर्क करत असल्याचं समोर आलं आहे. महामंडळात नियुक्त्या देतो, विधानपरिषदेवर घेतो असं सांगितलं जातं आणि एक्स्टॉर्शन केलं जातं. असच अनेक नेत्यांना देखील ईडी, सीबीआयचे धाक दाखवून पैसे मागितले जातात. अनेक महिलांनी मला येऊन माहिती दिली आहे. 8 तासांचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत. हा व्यक्ती extortion करत आहे. असे उपरे दलाल महाराष्ट्रात येतात आणि महिलांना त्रास देतात. किरीट सोमय्या त्यांचं नाव आहे. माता भगिनींना त्रास देणाऱ्या किरीट सोमय्यांना सरकार सुरक्षा देणार का? मी त्याचा पेन ड्राईव्ह आपल्याला देतो. हा माणूस पुन्हा मुंबई पोलिसांना पत्र लिहितो आणि चौकशी करा म्हणतो.”

दरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “जो विषय मांडला आहे तो गंभीर आहे. राजकारणात अनेक प्रसंग येत असतात. माझ्याकडे पुरावे द्या. कोणालाही पाठिशी घालणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. कुठलंही प्रकरण दाबलं जाणार नाही. सखोल आणि वरिष्ठ स्तरावरील चौकशी केली जाईल,” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी दिला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here