Kirit somayya :
किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हीडिओ प्रकरणाची सखोल आणि उच्च स्तरावर चौकशी होईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी हा विषय सभागृहात मांडला. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात या प्रकरणी चौकशीची मागणी केली होती.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली असून आरोप- प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. अपेक्षेप्रमाणे हा मुद्दा विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही गाजला आहे.
https://thepointnow.in/bachhu-kadu-press-conference/
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “जो विषय मांडला आहे तो गंभीर आहे. राजकारणात अनेक प्रसंग येत असतात. माझ्याकडे पुरावे द्या. कोणालाही पाठिशी घातल जाणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. कुठलंही प्रकरण दाबलं जाणार नाही. सखोल आणि वरिष्ठ स्तरावरील चौकशी केली जाईल,” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ एका मराठी वृत्तवाहिनीने प्रसारित केल्यानंतर त्यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. यावर प्रतिक्रिया देत किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहत चौकशी करण्याची मागणी केली होती.
दरम्यान एका ज्येष्ठ राजकीय नेत्याची आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे. या प्रकरणी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली होती. मात्र आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार असल्याचं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल आहे. यामुळे या चौकशीमध्ये काय समोर येणार हे बघणं अधिकच महत्त्वाचे ठरेल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम