(Ajit pawar group meets sharad pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडत मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार गटातील आमदार शरद पवार यांच्या भेटीला जात आहेत. आज देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे समर्थक नेते आणि आमदार यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या या भेटीगाठी मुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकी काय खलबत्त सुरू आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले यात शोक प्रस्तावानंतर आजच कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आणि लगेचच काही वेळात अजित पवार आणि त्यांच्या गटातील प्रमुख पदाधिकारी व आमदार हे शरद पवार यांना भेटण्यासाठी गेले. यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि सोबत असलेल्या आमदारांनी जवळपास 45 मिनिट शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली आहे.
https://thepointnow.in/maharashtra-monsoon-assembly-session-3/
दरम्यान आजच्या भेटीनंतर प्रफुल्ल पवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला यात त्यांनी सांगितलं की, काल प्रमुख नेते व मंत्री यांच्यासह आम्ही शरद पवार यांची भेट घेतली. काल अनेक आमदार हे त्यांच्या मतदार संघामध्ये होते. आजपासून अधिवेशन असल्यामुळे बहुतांश आमदार उपस्थित झाले आहेत. यामुळेच या आमदारांसह आम्ही शरद पवार यांची भेट घेतली. यात आम्ही काल त्यांना जी विनंती केली तीच विनंती आज देखील केली आहे. शरद पवार यांनी सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं मात्र त्यावर त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाहीये, मात्र असं असलं तरीही ते आमच्या भावना आणि मागण्यांचा नक्की विचार करतील अशी खात्री आम्हाला असल्याचा विश्वास प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये शरद पवार यांच्या भेटीसाठी रविवारी अजित पवार गट पोहोचला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, अदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील, धर्मराव बाबा पाटील, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ यांच्यासह अनेक आमदार यावेळी उपस्थित होते.
दरम्यान अचानक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून शरद पवार यांची भेट घेण्यात आल्याने नेमकी काय खलबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू आहेत अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र ही बैठक पूर्वनियोजित नसून अचानक घेण्यात आली होती. यात शरद पवार यांचे आशीर्वाद आम्ही घेतले असून राष्ट्रवादी एक संघ रहावा ही विनंती केल्याचं सांगण्यात आलं होतं. या भेटीत शरद पवार यांनी सर्व ऐकून घेतलं पण त्यावर प्रतिक्रिया दिली नव्हती असं प्रफुल्ल पटेल यांनी भेटीनंतर सांगितलं होत. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या भेट सत्रामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम