Bacchu kadu : आणि म्हणून मला गुवाहाटीला जावं लागलं ; नाराज बच्चू कडूंनी बोलून दाखवली मनातली खदखद

0
27

Bacchu kadu : गेल्या काही दिवसांपासून प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि अपक्ष आमदार असलेले बच्चू कडू हे अस्वस्थ असल्याचं बघायला मिळत आहे. बच्चू कडू हे मंत्रीपदामुळे नाराज असल्याची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे. याबाबत अनेकदा बच्चू कडू यांनी देखील सूचक विधान केलीत, मात्र आता ते सरकारमध्ये राहणार की सरकार मधून बाहेर पडणार हे लवकरच स्पष्ट करून असं सूचक विधान बच्चू कडू यांनी केल आहे.

 

याबाबत आज बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत येता 18 जुलैला पण आपली भूमिका स्पष्ट करू असं सांगितल आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आपल्याला वारंवार फोन येत असल्यास देखील त्यांनी सांगितलं.

 

महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना उद्धव ठाकरे यांच्या सत्ता स्थापनेच्या वेळेस घडलेल्या घडामोडींबद्दल त्यांनी यावेळी आठवण करून दिली. ते म्हणाले की, मागच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्ही दोन आमदार गेलो होतो उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करून आपला पाठिंबा मागितला होता. त्यावेळी आम्ही त्यांना पाठिंबा देखील दिला आम्हाला इतर पक्षांकडून आमिष दाखवण्यात आली पण आम्ही आमच्या पाठिंबावर ठाम राहिलो तसेच उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या शब्दावर ठाम राहत मला राज्यमंत्रीपद दिल. पुढे राज्यात सत्ता समीकरण जुळून आली. यावेळी आम्ही उद्धव ठाकरे यांना दिव्यांग मंत्रालयासाठी वारंवार भेटत होतो. त्याचवेळी दिव्यांग मंत्रालय झाले असते, तर गुवाहाटी ला जाण्याची वेळ आली नसती असं म्हणत त्यांनी आपल्या अप्रत्यक्षपणे आपल्या गुहावटीला जाण्याचं कारण स्पष्ट केलं आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालय तयार केलं आणि ही माझ्यासाठी आयुष्यातली सगळ्यात मोठी घटना आहे. माझ्या गुहावटीला जाण्यामुळे देशातलं सर्वात पहिलं दिव्यांग मंत्रालय अस्तित्वात आलं. यामुळे मी वैयक्तिक पातळीवर एकनाथ शिंदे यांचे आयुष्यभर आभार मानेल.

 

बदलत्या सत्ता आणि पैश्याच राजकारण याचा मला कंटाळा आला आहे. याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा विचित्र आहे. याला स्थिरता यायला हवी. जे लोक म्हणतात की तुम्हाला पद मिळणार नाही त्यांची मी पर्वा करत नाही. आमची भूमिका ठाम आहे. आम्ही इथून पुढे दिव्यांगांसाठी तसेच शहीद परिवारांसाठी काम करणार असल्याची भूमिका बच्चू कडू यांनी स्पष्ट केली.

 

दरम्यान आपण आज मंत्रिपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो. मात्र गेल्या काही तासांपासून मुख्यमंत्री आपल्याला वारंवार फोन करत आहेत. त्यांनी मला त्यांची भेट घेतल्यानंतर निर्णय घेण्यासंदर्भात विनंती केली आहे. “तू आज हा निर्णय घेऊ नकोस मी भेटल्यानंतर याबाबत निर्णय घे.” असं त्यांनी सांगितलं असल्यामुळे 17 जुलैला आमची भेट झाल्यानंतर 18 जुलै रोजी मी माझा निर्णय जाहीर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केल आहे. यामुळे आता अपक्ष आमदार बच्चू कडू हे सत्तेत सामील राहणारी तिचे मूड करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here