राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष झाल्यानंतर आज राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदा मुंबई येथील पक्ष कार्यालयात पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्ताधारी शिंदे व भाजप सरकारवर विविध विषयांवर टिकास्त्र सोडत त्यांचा चांगला खरपूस समाचार घेतला आहे.
सुप्रिया सुळेंची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर आज त्या राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयात दाखल झाल्या. तिथे त्यांचे कार्यकर्त्यांनी जोरदार ढोलताशांच्या गजरात स्वागत केले. तसेच स्वागतासाठी मोठेमोठे बॅनर्स लावण्यात आले होते.
सरकारकडून सुरू असलेल्या जाहिरात आणि बॅनरबाजी वर त्यांनी भाष्य करत सत्तेत असलेले नेते जाहिरात आणि बॅनरबाजीत अडकत असतील तर दुर्दैव आहे. हे आपण हसण्यावारी घेत आहोत पण पक्ष आणि सत्तेत असलेले एवढे मोठे नेते जाहिरात आणि बॅनरबाजीत अडकत असतील तर या राज्याचं काम कुठल्या दिशेने चाललंय? महाराष्ट्र नक्की कोण चालवतय? असे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले आहेत.
याचबरोबर त्यांनी विरोधकांवर टीका करताना ‘ चेहरा मत देणार की पॉलिसी मत देणार? कोणत्या योजना आल्या किती निधी आले? किती एम्स आले किती ऑप्रेशनल आहेत? मेन पॉलिसी काय? हे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात पॉलिसी पॅरालिसिस आहे,’ असं म्हणत त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर तोफ डागली आहे. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार लोकशाही पासून दूर जात असल्याची देखील टीका केली आहे.
तसेच मरीन ड्राईव्हला घडलेल्या प्रकरणातील त्या पीडित मुलीचे पालक भेटले त्यांनीही काही मागण्या केल्या असून त्यांचे फॉलोअप पोलिसांकडून घेतले आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारला आपण विनंती करणार आहे. महिलांच्या विरोधात राज्यात घटना होत आहेत त्या वाढत आहेत याला महाराष्ट्राचे गृह खाते जबाबदार असल्याचं डेटा मधून दिसून येत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटल आहे.
तसेच महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार महिलांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहे. दादाही महिला सुरक्षे बाबत सकाळी सविस्तर बोलले दिल्लीमध्ये ऑलम्पिक विजेत्यांची केंद्राने ज्या पद्धतीने केस हाताळली हा पहिला मुद्दा असल्याचे म्हणत त्यांनी याबाबतीत राज्य सरकारला पत्र लिहिणार असल्याचं सांगितलं आहे.
काय होती घटना?
मुंबईत पुन्हा एकदा धावत्या लोकलमध्ये एका युवतीवर लैगिंक अत्याचार झाल्याची घटना बुधवारी समोर आली होती. बुधवारी सकाळी ७ वाजून २६ मिनिटांच्या CSMT-पनवेल लोकलच्या द्वितीय श्रेणीच्या महिला डब्यात प्रवास करण्यासाठी एक २० वर्षीय विद्यार्थिनी बसली होती. ट्रेन सुरू होताच आरोपी नवाजू करीम डब्यात चढला व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. विद्यार्थिनीने आरडाओरडा करत स्वतःला बचाव करण्याचा प्रयत्नही केला. ट्रेन मस्जिद रेल्वे स्थानकावर येताच विद्यार्थिनी ट्रेनमधून उतरून स्वतःचा बचाव केला. जीआरपी आणि आरपीएफच्या संयुक्त पथकाने आरोपी नवाजू करीमला मस्जिद येथून ४ तासांत अटक केली. पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम