देवळा येथील मेतकर पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

0
17

देवळा : मधुकर पांडुरंग मेतकर ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची सन-२०२३ ते २०२८ वर्षाकरीता संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली.

देवळा येथील आर्थिक सक्षम व आर्थिक प्रगती सोबतच नाविन्यपूर्ण सामाजिक कार्यात सतत आघाडीवर असलेल्या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक संस्थेचे संस्थापक दिलीप मेतकर यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली.

नविन बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांमध्ये सर्वस्वी अजय शांताराम मेतकर, संतोष शिवाजी शिंदे,सुरेश दगा नेरकर, विष्णू सुखदेव जाधव ,तेजस विजय मेतकर, केतन पारसमल लुंकड ,जाकीर शब्बीर शेख ,शुभांगी ज्ञानेश्वर मेतकर, माधुरी दिलीप मेतकर, नितीन प्रकाश शिंपी ,गिरीश रमेश कचवे ,नानाजी निंबा चंदन यांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी नितीन तोरवणे यांनी कामकाज बघितले .नवनिर्वाचित संचालकांचे देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, मविप्र चे संचालक विजय पगार , उपसभापती अभिमन पवार, संचालक भाऊसाहेब पगार ,माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर ,गटनेते संभाजी आहेर ,आदींनी अभिनंदन केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here