देवळा : येथील कर्मवीर रामरावजी आहेर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी विज्ञान शाखेचा निकाल ९७.६६ टक्के तर वाणिज्य शाखेचा ९६.६२ टक्के लागला. कला व किमान कौशल्य यांचा अनुक्रमे ८८.२६ व ९२.८५ टक्के लागला. कला शाखेत संजना संज्योत देवरे हिने ८५.८३ टक्के गुण मिळवत महाविद्यालयात तसेच देवळा केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. या परीक्षेत कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेत मुलींनी बाजी मारत अव्वल स्थान मिळवले.
विज्ञान शाखेत २५७ पैकी २५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात तनिष्का दिलीप पाटील ७९.६७ टक्के गुण मिळवून प्रथम आली. तेजस्विनी संदीप थोरात (७५) व धनश्री केदा आहेर (७४.८३) हे द्वितीय व तृतीय आले.
वाणिज्य शाखेत ८९ पैकी ८६ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. राजेश्वरी अहिरराव (७८.५०) प्रथम आली. शीतल बाविस्कर ७५.६७ व कार्तिक शेवाळकर ७२.१७ टक्के गुण मिळवत द्वितीय व तृतीय आले. कला शाखेत प्रथम – संजना संज्योत देवरे (८५.८३), द्वितीय – कोमल भास्कर गुंजाळ(८३) आणि तृतीय -सुजल भरत खत्री (७४.६७)
गुणवंत विद्यार्थ्यांचे प्राचार्य हितेंद्र आहेर, संस्थेचे सचिव पी.टी. पवार, प्रशासकीय अधिकारी डॉ.मालती आहेर, उपप्राचार्य बी.के. रौदळ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम