महिला सरपंचांचे स्वतःच्या रक्तानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

0
28

देवळा प्रतिनिधी : देवळा तालुक्यातील मेशी येथील भाजपच्या आदिवासी महिला सरपंचांनी स्वतःच्या रक्तानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल्याने स्वपक्षालाच घरचा आहेर मिळाला असून, राजकीय वर्तुळात यामुळे एकच खळबळ उडाली
आहे .
Love Marriage: ‘प्रेम विवाहांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढले, सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक माहिती समोर
मेशी ता.देवळा येथील आदिवासी महिला सरपंच सौ.सुनंदा अहिरे यांनी ग्रामीण भागातील समस्या व खास करून शेतकरी कुटुंबांची झालेली वाताहत या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वतःच्या रक्तानेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून त्यात ग्रामीण भागातील जनतेची तहान भागविण्यासाठी मागील वर्षी खासगी विहिरी अधिग्रहित करून गावातील जनतेला पाणी मिळवून दिले खरे पण वर्ष उलटले तरीही शासनामार्फत सदर बिले अदा केली गेली नाहीत , शासनामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कृषी योजना , ट्रॅक्टर, औजारे यांचे अनुदान वेळेत मिळत नाहीत तसेच शेतकऱ्यांचा खास जीवन – मरणाचा प्रश्न म्हणजे कांदा हाच असून देशाला स्वातंत्र्यानंतर मिळून पंचाहत्तर वर्षी उलटली तरीही कांदा हा दोनशे ते तीनशे रुपये प्रतिक्विंटल विकला जात असून त्यातून उत्पादन खर्च देखील निघत नाही त्यामुळे कांद्याला किमान तीन हजार रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा.

एक महिला सरपंच तसेच स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याने स्थानिक पातळीवर हे वरील सर्व प्रश्न खूप भेडसावत असल्याने या सर्व गोष्टींवर गांभीर्याने विचार करत शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंती सौ.अहिरे यांनी पत्रात केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here