देवळा : शासनाच्या नवीन वाळू धोरणाच्या विरोधात देवळा तालुक्यातील भऊर, विठेवाडी, सावकी, खामखेडा, लोहोणेर, आदी गावांच्या प्रखर विरोधापूढे प्रशासन पुतरे हतबल झाले असून ,अखेर वाळू निविदा प्रक्रिया रद्द करण्या संदर्भात वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय आज देवळा तहसीलदार कार्यालयात आ.डॉ.राहुल आहेर व अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
लाचखोर जिल्हा उपनिबंधक खरे ACB च्या जाळ्यात; 30 लाखांची लाच घेणे भोवले
शासनाच्या वाळू ठिय्याच्या लिलाव धोरणास तालुक्यातील भऊर, विठेवाडी, सावकी, खामखेडा, लोहोणेर ह्या गिरणा काठावरील गावातील शेतकऱ्यांनी प्रखर विरोध दर्शविली असून, यासंदर्भात मंगळवारी दि १६ रोजी तहसील कार्यालयात आमदार डॉ राहुल आहेर यांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली .यावेळी ग्रामस्थांनी आमच्या गावातील एक ही वाळूचा कण बाहेर जाऊ देणार नाही. अमर्याद वाळू उपसा मूळे आमची शेती उजाड होऊन पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे . त्यामुळे शासनाच्या नवीन वाळू धोरणास आमचा विरोध कायम असेल अशी भूमिका संबंधित गावातील पदाधिकाऱ्यांनी बैठकीत तीव्र असंतोष व्यक्त केला .
गावपूर्तीच आवश्यक तेवढी वाळू आम्ही घेऊ अशी भूमिका मांडत वाळू ठिय्यास विरोध दर्शविण्यासाठी संबंधित सर्व गावाचे ठराव शासनाला सादर करण्यात येतिल .असे सांगण्यात आले तर तुमच्या गावांसाठी वर्षभरात अंदाजे किती वाळू लागेल याचा प्रस्ताव सदरच्या गावाने प्रशासनाला पाठवावा व त्यासाठी आवश्यक ती परवानगी घेऊन व रॉयल्टी भरून आपणास ती वाळू घेता येईल व सदरची वाळू संबंधित ग्रामपंचायतिने त्यांच्या अधिकारात घ्यावी .वाळूची साठवणूक संबंधित ग्रामपंचायतिने करावी व त्या साठवणुकीच्या जिओ टॕक फोटो शासनाला पाठवावा लागेल. वाहतुकीसाठीच्या वाहनांची ऑनलाइन परवानगी घ्यावी लागेल व त्यासाठी जीपीएस लावण्यात येईल तसेच वाळू चोरी रोखण्याची जबाबदारी गावाची व ग्रामपंचायतिची देखील राहील .
अवैध वाळू वाहतूक अथवा चोरी आढळल्यास संबंधित ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांवर आपत्रतेची कारवाई करण्यात येईल असे अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांनी सांगितले . संबंधित गावांचा प्रखर विरोध लक्षात घेता झालेली निविदा प्रक्रिया रद्द करण्यासाठी आलेले ठराव वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगितले . सदर बैठकीस आ.डॉ.राहुल आहेर, अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे ,उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार विजय सूर्यवंशी, गटविकास अधिकारी राजेश देशमुख, यांच्यासह अभिमन पवार , जगदीश पवार , कुबेर जाधव , विलास निकम , शशिकांत निकम , कारभारी पवार, नानाजी पवार, भास्कर निकम, विठोबा सोनवणे, पी डी, निकम, धना निकम, राजेंद्र निकम, भालचंद्र निकम, संजय निकम, संजय सावळे, माणिक निकम ,अभिजित निकम, ईश्वर निकम, रामदास निकम, धनंजय बोरसे, निंबा निकम, पुंडलिक निकम, महेंद्र आहेर, स्वप्निल निकम, रविंद्र निकम, दिलिप निकम, सुभाष निकम, सुभाष कापडणीस, गणेश शेवाळे, बाळासाहेब निकम, बबलु निकम, राजेंद्र आहेर, शंकर निकम, नितीन पवार, पुंडलिक सोनवणे, हेमंत निकम, विनोद आहेर आदी ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम