देवळा : देवळा शिक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या “बेटी बचाओ बेटी पढाओ” उपक्रमांतर्गत विविध स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सोमवारी दि १५ रोजी गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
देवळा पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने बेटी बचाओ बेटी पढ़ाओ उपक्रमांतर्गत देवळा तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धांतील निवडप्राप्त विद्यार्थिनी व राष्ट्रीय स्तरावरिल क्रीडा प्रकारात नैपुण्यप्राप्त विद्यार्थिनींना रोख स्वरुपात पारितोषिक वाटप करण्यात आले.
निबंध स्पर्धा (लहान गट) प्रथम – रुचिका राजेश शेवाळे – जनता विद्यालय, लोहेणेर
द्वितीय – आस्था अशोक खरे – जिल्हापरिषद शाळा, वरवंडी
तृतीय- वैष्णवी किरण देशमुख- जनता विद्यालय, लोहोनेर
निबंध स्पर्धा (मोठा गट) प्रथम – संस्कृती प्रकाश अहिरे- जनता विद्यालय ,लोहनेर
द्वितीय – श्रुती राघों शिंदे – कर्मवीर रामराम आहेर महाविद्यालय
देवळा तृतीय- रूपाली मन्साराम देवरे जनता विद्यालय, मेशी
चित्रकला स्पर्धा-प्रथम- दामिनी गजानन जगताप- जनता विद्यालय, मेशी
द्वितीय – खुशी दीपक सावकार- कर्म .रामराव आहेर महा . देवळा
राष्ट्रीय स्तर बॉल बॅडमिंटन खेळाडू शीतल खंडू आहेर, विशाखा सुनिल देवरे, प्रियंका दादाजी देवरे या कर्मवीर रामराव आहेर महा. देवळा येथील विद्यार्थिनींना रोख पारितोषिक (धनादेश) वाटप करण्यात आले.
यावेळू गटशिक्षणाधिकारी सतिश बच्छाव, विस्तार अधिकारी किरण विसावे, मुख्याध्यापक यशवंत बैरागी, संदीप जाधव, लक्ष्मण सूर्यवंशी आदींसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम