निरंजन देवळा विकास सोसायटीच्या चेअरमन पदी योगेश आहेर यांची तर व्हा चेअरमन पदी जिजाबाई आहेर यांची बिनविरोध निवड

0
18
निरंजन देवळा विकास सोसायटीचे चेअरमन योगेश आहेर , व्हा चेअरमन जिजाबाई आहेर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करतांना सहायक निबधक सुजय पोटे समवेत संचालक मंडळ आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा : निरंजन देवळा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी योगेश शांताराम आहेर यांची तर व्हा चेअरमन पदी जिजाबाई खंडेराव आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली . निरंजन देवळा विकास सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक ९ मार्च रोजी बिनविरोध झाली .

निरंजन देवळा विकास सोसायटीचे चेअरमन योगेश आहेर व्हा चेअरमन जिजाबाई आहेर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करतांना सहायक निबधक सुजय पोटे समवेत संचालक मंडळ आदी छाया सोमनाथ जगताप

या संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी आज मंगळवारी (दि ११ )रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबधक सुजय पोटे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १ वाजता संचालक मंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती . यावेळी चेअरमन पदासाठी योगेश आहेर यांचा तर व्हा चेअरमन पदासाठी जिजाबाई आहेर यांचा निर्धारित वेळेत अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली .

याप्रसंगी दगा आहेर, प्रदीप आहेर, रविंद्र आहेर, सुनील आहेर, दीपक आहेर, राजेश आहेर, उत्तम आहेर, दीपक निकम ,दादाजी सोनारे, विमलबाई आहेर, शांताबाई गुजरे , सचिव संदीप ठुबे आदी उपस्थित होते . नूतन पदाधिकाऱ्यांचे सहकार क्षेत्रातून अभिनंदन होत आहे .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here