देवळा : येथील आशापुरी महिला नागरी सहकारी पतसंस्थेस या आर्थिक वर्षात ६ लाख १२ हजार ९३२/- रुपये निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेच्या चेअरमन प्रियंका भुषण कोठावदे यांनी दिली.
मार्च २०२३ अखेर संस्थेकडे २ कोटी ३६ लाख ५६ हजार ५७५/- रुपयांच्या ठेवी जमा झालेल्या असुन कर्जवाटप रु. २ कोटी ०९ लाख ८० हजार ८५९/- रुपयांचे झालेले आहे. संस्थेने विविध वित्तीय संस्थांमध्ये १ कोटी २६ लाख १५ हजार ३४८/-रुपयांची सुरक्षित गुंतवणूक केलेली असुन, संस्थेचे वसुल भागभांडवल रु.७३ लाख १७ हजार २३५/- रुपयांचे आहे. संस्थेकडे विविध प्रकारचा निधी रु.२४ लाख ५५ हजार ६८९/- रुपये जमा झालेला असुन वर्षअखेर संस्थेचे खेळते भागभांडवल ३ कोटी ४६ लाख ६९ हजार १३६/- रुपये झालेले आहे. संस्थेचे कर्ज वसुलीचे प्रमाण हे ९४.६०% असुन थकबाकी ५.४०% आहे. संस्थेचा सी.डी. रेशो ६४.२४% आहे.
पतसंस्था स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभी असुन संस्थेने जमलेल्या निधीतुनच कर्जवाटप व दैनंदिन खर्च भागविलेला असुन संस्थेने इतर संस्थांकडुन कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतलेले नाही. संस्थेने वेळोवेळी विविध प्रकारच्या नाविण्यपुर्ण ठेव योजना राबविलेल्या असुन त्यास परिसरातुन मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. संस्थेने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन देवळा गावातील धुणे-भांडी करणाऱ्या ,शेतमजुर, आशावर्कर, विधवा, घटस्फोटीत, सफाई कामगार, आर्थिक दृष्टया दुर्बल अशा ११ महिलांना विमानाने हैदराबाद सहल संस्थेच्या समन्वयकाने घडविली आहे.
पतसंस्थेच्या या सर्वांगीण विकासाच्या घोडदौडीत डॉ. विजयजी सुर्यवंशी , सहाय्यक निबंधक सुजय पोटे तसेच संस्थेचे संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग, बचत प्रतिनिधी, सभासद, ठेवीदार, हितचिंतक मित्र परीवार यांचा सिंहाचा वाटा आहे.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापिका कोमल कोठावदे, व्हा.चेअरमन प्रिती ठक्कर कार्य. संचालिका भारती दुसाणे, संचालिका अर्चना वाघमारे, दिपाली जाधव, पुनम अहिरराव, प्रतिभा ब्राम्हणकार, चारुशिला धामणे, मानसी वाघमारे, छाया निकम, दिपाली भिलोरे, श्वेता देवरे, स्वाती हिरे, तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा अश्विनी आहेर, व्यवस्थापक अनिताआहेर, सविता सोनवणे, सलोनी कोठावदे, नंदकुमार खरोटे, बचत प्रतिनिधी सिंधुबाई मेतकर, ज्ञानेश्वर मेतकर आदि उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम