हनुमान जयंती निमित्त देवळा येथे महाप्रसादाबरोबर हनुमान चालीसा वाटप

0
40
देवळा येथे हनुमान जयंती निमित्ताने भाविकांना हनुमान चाळीसा व महाप्रसादचे वाटप करतांना नगरसेवक योगेश आहेर समवेत उपस्थित भाविक व मंडळाचे सदस्य आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा : देवळा शहरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यानिमित्ताने नगरसेवक योगेश उर्फ नानू आहेर यांच्या संकल्पनेतून एकता फ्रेंड सर्कलच्या वतीने येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तांना हनुमान चालीसा वाटप करण्यात आल्या . तसेच महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते .

देवळा येथे हनुमान जयंती निमित्ताने भाविकांना हनुमान चाळीसा व महाप्रसादचे वाटप करतांना नगरसेवक योगेश आहेर समवेत उपस्थित भाविक व मंडळाचे सदस्य आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

याचा देवळा शहरातील तसेच गडावर जाणाऱ्या येणाऱ्या भाविकांनी लाभ घेऊन या स्तुत्य उपक्रमाचे कौतूक केले . एकता फ्रेंड सर्कलच्या वतीने अशा प्रकारे सामाजिक उपक्रम वेळोवेळी राबविले जातात .

Deola demco bank: देमको बँकेस तीन कोटी २४ लाख १० हजार रुपयांचा नफा

या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष अशोक आहेर, माजी उप नगराध्यक्ष जितेंद्र आहेर, बाबाजी पाटिलआदींसह भुषण संकलेचा, कपिल खरोटे, सत्यम आहेर, सुमित शिवदे, अशोक आहेर, राहुल पवार, सागर सोनवणे, सागर लाडे, हर्षल मेतकर, सुनिल सांबरे, मनोज मेतकर, भुषण आहेर, नरेश चव्हाण, योगेश आहेर, अमोल आहेर, तेजस मेतकर, वैभव शिवदे, सनी मोरे, मोहन गांगुर्डे, रोहित शिवदे, धनंजय गांगुर्डे. आदी उपस्थित होते. दरम्यान , तालुक्यात ठीक ठिकाणी हनुमान जयंती साजरी करण्यात आली .विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले . गावागावातील हनुमान मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून आली .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here