देवळा बाजार समिती निवडणुकीत चुरस वाढणार योगेश आबा मैदानात

0
10
देवळा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सोसायटी गटातून उमेदवारी अर्ज दाखल करतांना कुबेर जाधव समवेत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी संचालक पंडितराव निकम ,मजूर फेडरेशनचे संचालक सतीश सोमवंशी आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा : देवळा  बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज  शुक्रवारी( दि ३१ ) रोजी अखेर एकूण ५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.  या बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण अठरा जागांसाठी सोमवारी (दि २७) पासून उमेदवारी अर्ज विक्री व  दाखल करण्यास सुरुवात झाली आहे .

देवळा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सोसायटी गटातून उमेदवारी अर्ज दाखल करतांना कुबेर जाधव समवेत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी संचालक पंडितराव निकम मजूर फेडरेशनचे संचालक सतीश सोमवंशी आदी छाया सोमनाथ जगताप
देवळा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सोसायटी गटातून उमेदवारी अर्ज दाखल करतांना कुबेर जाधव समवेत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी संचालक पंडितराव निकम मजूर फेडरेशनचे संचालक सतीश सोमवंशी आदी छाया सोमनाथ जगताप

बाजार समितीचे माजी सभापती योगेश आहेर , माजी उपसभापती दिलीप पाटील , माजी संचालक सुनील देवरे , संजय शिंदे , जगदीश पवार , माजी सरपंच दीपक बच्छाव , सरपंच स्वप्नील अहिरे , युवा उधोजक कैलास देवरे , माजी सरपंच शिवाजी अहिरे ,प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव यांच्या पत्नी खर्डे विकास सोसायटीच्या चेअरमन दीपाली जाधव तसेच , उपसरपंच सुनील जाधव , विकास सोसायटीचे संचालक संदीप पवार तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव आदी मातब्बरांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत चुरस पाहावयास मिळणार आहे .

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची  सोमवारी दि ३  एप्रिल रोजी अंतिम मुदत असून , या दिवशी सर्वाधिक अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रशासक व सहायक निंबंधक  सुजय पोटे कामकाज बघत आहेत .गट निहाय दाखल अर्ज पुढील प्रमाणे सोसायटी गट (३१)  ,व्यापारी गट ( ६) ,हमाल व तोलारी गट( ३) ,ग्रामपंचायत गट (११) याप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती  निवडणूक निर्णय अधिकारी सुजय पोटे यांनी दिली . दरम्यान ,बाजार समितीच्या निवडणुकीमुळे गावागावांत इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून , उमेदवारी मिळविण्यासाठी नेत्यांकडे फिल्डिंग लावण्याची  लगभग पहावयास मिळत आहे .

यानिमित्ताने राजकीय घडामोडीना वेग आला असून , निवडणूक बिनविरोध होणार कि ,चुरशीची लढत रंगणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.  खरे चित्र माघारीनंतर स्पष्ट होईल .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here