मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी नारायण राणे यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे.सार्वजनिक मंचावरुन राणेंनी खोटे आरोप केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे. नोटिशीबाबत ट्विटरवरुन संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. नारायण राणेंनी या नोटिसीनंतर माफी देखील मागितली नाही तर न्यायालयात त्यांच्यावर खटला दाखल करणार असल्याचे देखील शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.
नारायण राणेंचे नेमके वक्तव्य काय होते?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरून संजय राऊत यांना खासदार बनवले आणि त्यासाठी मी पैसे खर्च केले असे नारायण राणे यांनी म्हटलेले आहे. त्यावरून खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांना मानहानीची नोटीस पाठविली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी २००४ मध्ये आपल्याला संजय राऊत यांना खासदार बनविण्यास सांगितले होते. त्यावेळी मी विरोधी पक्षनेता होतो. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना दुसऱ्याच व्यक्तीला खासदार बनवायचे होते.परंतु बाळासाहेबांच्या सांगण्यावरून मी संजय राऊत यांचा अर्ज भरून घेतला होता. निवडणुकीच्या यादीत त्यांचे नाव देखील नव्हते असा दावा नारायण राणे यांनी अलीकडेच केलेला आहे.
धक्कादायक! शिंदे गटातील नेत्याच्या पत्नीची आत्महत्या
नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष जुना आहे. नारायण राणे हे एकेकाळचे कट्टर शिवसैनिक होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या वरदहस्ताने ते मुख्यमंत्री पदापर्यंतही पोहोचले. परंतु पुढे काही कारणावरुन त्यांचे बाळासाहेब ठकरे यांच्या हायातीतच शिवसेनेशी बिनसले. त्यातून त्यांनी शिवसेना काढता पाय घेतला. तिथून त्यांनी थेट काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून शिवसेना आणि राणे यांच्यात वाद आहेत. आता नारायण राणे भाजपमध्ये आहेत. भाजपमध्ये असलेल्या राणे पितापुत्रांनी अनेक वेळा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलेला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम