धक्कादायक! शिंदे गटातील नेत्याच्या पत्नीची आत्महत्या

0
38

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. शिंदे गटातील निलेश माझिरे Nilesh Mazire यांच्या पत्नीने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे.

नीलेश माझिरे यांच्या पत्नीने बुधवारी रात्री विष प्राशन केले होते. गुरुवारी रात्री त्यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. कौटुंबिक वादातून आत्महत्या (Suicide) केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.

ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा; गिसाका शेअर्स प्रकरणी केली चौकशीची मागणी

माझिरे हे माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. निलेश माझिरे हे मनसे नेते वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक होते. काही दिवसांपूर्वी त्यांची मनसेमधून हकालपट्टी करण्यात आली होती.त्यानंतर त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला होता.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here