नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. सत्यजित तांबे आणि शुंभागी पाटील यांच्यात थेट लढत झाली असून निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे अनेकांचे लक्ष आहे. मात्र सत्यजित तांबे यांना निवडणुकीच्या निकालाआधीच एक धक्का बसला आहे. तांबे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आणि नाशिक काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष ( ग्रामीण ) मानस पगार यांचे काल रात्री अपघाती निधन झाले आहे.
नाशकात ग्रॅज्युएट मतदारसंघाच्या मतमोजणीला झाली सुरुवात
सत्यजित तांबे यांनी स्वतः ट्विट करत आपल्या जवळच्या सहकाऱ्यांला श्रद्धांजली व्यक्त केली आहे. तर फेसबुक, ट्विटरवर अनेकजण मानस पगारच्या अपघाती निधनाबाबत दुःख व्यक्त करत आहेत.आज नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागणार होता. त्या पार्श्वभूमीवर मानस पगार आणि त्यांच्यासोबत काही सहकारी नाशिक हुन पिंपळगाव बसवंत जात असताना हा अपघात घडला. नाशिकमधील लोकमान्य रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र मानस यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. इतर लोकांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम