The point now – मोबाईल ही आजच्या युगात लोकांची गरज बनली आहे. प्रत्येकाकडे कोणता ना कोणता फोन नक्कीच असतो. त्याच वेळी लोक अनेकदा नवीन मोबाइल नंबर घेतात आणि जुना बंद करतात. अशा परिस्थितीत लोकांनी काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये जुना मोबाईल नंबर लिंक केला तरी ते नवीन नंबर अपडेट करायला विसरतात. अशा परिस्थितीत लोकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
• जर तुम्ही मोबाईल नंबर बदलला असेल तर नवीन नंबर तुमच्या महत्वाच्या खात्यात अपडेट करावा. यामध्ये बँक खाते आधार कार्ड, पीएफ खाते आणि इतर महत्त्वाच्या खात्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर आधार कार्डमध्ये मोबाईल क्रमांक अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डमध्ये अपडेट केला नसेल तर ते त्वरित करा. कारण आजच्या काळात मोबाईल आधार कार्डशी लिंक असलेले खूप फायदेशीर आहे कारण जास्त करून आपण आपल्या मोबाईल वरती सर्व काम करतो तर आपला मोबाईल आधार कार्डशी लिंक असणे खूप महत्त्वाचे आहे.
• मोबाईल नंबर आधार कार्डशी कसा लिंक करायचा?
तुमच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट द्या.आधार सुधार फॉर्म भरा. यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये जो मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे तो भरा.आधार एक्झिक्युटिव्ह प्रमाणीकरणासाठी तुमचे बायोमेट्रिक्स घेतो आणि शेवटी फॉर्म सबमिट होतो.
तुमच्या विनंतीबद्दल अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) स्लिप ठेवा. एक्झिक्युटिव्ह तुम्हाला तुमच्या विनंतीची पोचपावती देईल. आधार अपडेटची स्थिती जाणून घेण्यासाठी अपडेट रिक्वेस्ट नंबरचा वापर केला जाऊ शकतो.हि लिंकिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला आधार OTP मिळेल.आधार अपडेटची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही UIDAI च्या टोल फ्री क्रमांक 1947 वर कॉल करू शकता
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम