नवाब मलिकांचा जामीन अर्ज पुन्हा एकदा न्यायालायने फेटाळला

0
38

राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्या प्रकरणी आज न्यायालयात ११ वाजता सुनावणी होणार होती. आणि न्यायालायने हा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. न्यायालयाकडून नवाब मलिकांना कोणताही दिलासा मिळाला नाही. ईडी ने मलिकांवर केलेल्या गुन्ह्यांच्या संदर्भात आज पुन्हा एकदा सुनावणी झाली आहे.

याआधीही मलिकांनी जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु आजचा अर्ज देखील ना मंजूर झाला आहे. पण नवाब मलिकांवर उपचार सुरु असल्या कारणाने न्यायालयाने त्यांना उपचार पूर्ण होई पर्यंत हॉस्पिटल मध्ये राहण्याची परवानगी दिली आहे. आणि त्यांनतर नवाब मलिकांना तुरुंगात रवाना करण्यात येईल.

नवाब मलिक यांच्यावर ईडीने मनी लॉड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता, आणि त्यांनतर त्यांना अटक करण्यात आली होती. गोवावाला कंपाऊंड जमीन खरेदीमध्ये मनी लॉड्रिंग केल्याचा नवाब मलिकांवर गुन्हा दाखल केला होता. दाऊद इब्राहिमच्या टोळीसोबत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप मालिकांवर होता. दहशतवादाला आर्थिक पाठबळ दिल्याप्रकरणी त्यांच्या वर गंभीर आरोप करण्यात आला होता.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here