मुंबईत आज आगामी हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनीती ठरवण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती . बैठकीनंतर आदित्य ठाकरेंनी मेडियासोबत बोलताना आदित्य ठाकरेंनी शिंदे – फडणीस सरकार वर जोरदार टीका केली आहे.
‘एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे पडतोय. राज्य सरकार ने उद्योग मंत्र्यांना या सर्व प्रोसेस मधून का बाजूला ठेवल आहे? ज्यांचा याच्याशी काहीही संबंध ते का उत्तर देत आहेत? मुख्य मंत्री सोडून सगळे एमओयू प्रकरणावर बोलत आहेत.’ असे आदित्य ठाकरे यांनी टीका करताना म्हटले आहे. तसेच आदित्य ठाकरेंनी ‘तुम्ही मंचावर बसा, मीडियासमोर आणि माझ्यासमोर डिबेट करा’, असे आव्हान देखील मुख्यमंत्र्यांना केले आहे.
‘या सगळ्यांची ओळख तर गद्दार म्हणून च निर्माण झाली आहे. यांच्याकडून महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्याचे काम चालू आहे. महाराष्ट्राला कमी लेखण्याचा प्रयत्न होत आहे. या गद्दारांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर केली आहे. ज्या पद्धतीने राज्यपालांनी वक्तव्य केले होते त्यानुसार आता पर्यंत त्यांना पदमुक्त करायला हवे होते. पण अजूनही हे झाले नाही. जस गुजरात निवडणूक चालू असताना महाराष्ट्रातील उद्द्योग गुजरात मध्ये गेले तसेच आता कर्नाटक निवडणुकी मध्ये महाराष्ट्रातील गाव कर्नाटक मध्ये पळवली. महाराष्ट्रात गोवरच्या साथीने थैमान घातले आहे. यामुळे राज्यात १२ मुलांचा मृत्यू देखील झाला. तरीही अजूनही राज्यातील मंत्र्यांकडून ब्रीफिंग आलेलं नाही, बुलेटिन आलेलं नाही.कोरोना काळामध्ये ठाकरे सरकार कडून रोज कोरोनाबद्दल चे बुलेटिन जात होते. तसेच मुख्यमंत्री देखील जनतेशी फेसबुक द्वारे संवाद साधत होते. पण आता तास काहीच होताना दिसत नाही’, असे वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम