महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. राज्यपालांच्या वक्तव्यावर पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी ‘एखाद्या व्यक्तीला पद मिळते, मात्र त्याची ती पोहोच नसते’ असे म्हणत टीका केली आहे. ‘राज्यपाल एका मोठ्या पदावर आहे. म्हणून आपण सोडून देतो. या राजकारणात अनेक लोक अशी आहेत कि ज्यांना पद तर मिळाले आहे पण पोहोचनाही मिळाली. ‘ असे देखील राज ठाकरेंनी म्हटले आहे.
कर्नाटक सीमावादावर बोलताना देखील राज ठाकरेंनी सरकार वर टीका केली आहे. सीमावादाच्या प्रश्नावर राज ठाकरे असे म्हणाले कि ‘ अचानक सीमाप्रश्न कसा मधेच आला ? कोणत्या दुसऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला लावायचे आहे का? या प्रकरणावर सध्या दिल्लीमध्ये बैठकही झाल्या आहेत. त्यामुळे सध्या या प्रकरणाची न्यायालयात चौकशी चालू आहे. लवकरच न्यायालयाचा निर्णय देखील आपल्याला समजेल.’
पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी असे जाहीर केले आहे की ‘आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक मनसे स्वबळावर लढणार आहे. शिवसेना आणि वंचित यांच्या युतीवर राज ठाकरेंनी कोणतेही वक्तव्य केले नाही. १९६६ साली शिवसेनेचा जन्म झाला आणि शिवसेनेला १९६६ नंतर १९९५ साली मुंबई महापालिका शिवसेनेच्या हाती आली. मनसेला १६ – १७ वर्षे पूर्ण झाली आणि मनसे हा पक्ष स्थापन केला त्यावेळी महाराष्ट्राच्या अनेक तालुक्यात , असंख्य गावात झेंडे लावले आणि अनेक ठिकाणी मनसेच्या शाखा स्थापन करण्यात आल्या.’
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम