काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावरून वातावरण चांगलेच तापले होते. त्यासाठीच महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावरआहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भगत सिंह कोश्यारी यांना दिल्लीत पाचारण केल्याची सध्या चर्चा सुरु आहे. यावेळी राज्यपाल नेमंकी कोणाची भेट घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांना हटवण्यासाठी भाजपचे केंद्रीय नेतृत्व काही पावले उचलणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२ व्या दीक्षान्त समारंभ सोहळ्यात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यांबद्दल वक्तव्य केले होते. ‘शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो असल्याचे कोश्यारी म्हणाले होते. राज्यपालांचा या वक्तव्यानंतर राज्यभर ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात आंदोलनं करण्यात आली. तसेच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार उदयराजे भोसले यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी राज्यपालांचा विरोध केला. उदयनराजेंनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पत्रही लिहिलं होतं.
दीक्षान्त समारंभ सोहळ्यात बोलताना राज्यपाल म्हणाले होते की, “आम्ही शाळेत असताना आम्हाला शिक्षक विचारत होते की, तुमचा आवडता हिरो कोण आहे. त्यामुळे कोणाला सुभाषचंद्र भोस, कोणाला महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरु आवडायचे. त्यामुळे मला असं वाटतं की, तुम्हाला जर कोणी विचारलं तुमचे आवडता हिरो कोण आहे. तर तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. कारण तुम्हाला महाराष्ट्रातच ते सापडून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाची गोष्ट आहे, मी नवीन युगाची गोष्ट सांगतोय. डॉ. आंबेडकरांपासून तर नितीन गडकरीपर्यंत तुम्हाला इथेच भेटतील”, असे राज्यपालांनी म्हटले होते.
राज्यपालांकडून सातत्याने महाराष्ट्राची बदनामी होत आहे असा आरोप केला जात आहे. राज्यपालांनी याआधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला होता असा आरोप विरोधकांनी केला आहे. एवढेच काय तर सतत महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या मुख्यमंत्र्याना पदमुक्त करण्याची विरोधकांची मागणी आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम