कऱ्हाड : सातारा जिल्ह्याचे सुपुत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच कऱ्हाड दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कऱ्हाड दौर्यासाठीची जय्यत तयारी चालू आहे. मुख्यमंत्री पहिल्यांदा जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करणार आहेत. यांनतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध कामांचे उदघाटन सोहळे , भूमिपूजन आणि शिवसैनिकांचा मेळावा होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या कऱ्हाड दौऱ्याची आतुरता असण्याचे कारण म्हणजे मुख्यमंत्री हे सातारा जिल्ह्याचे सुपूत्र आहेत. भाजपच्या सहकार्यातुन मुख्यमंत्री शिंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना हा वेगळा पक्ष तयार करुन स्वतंत्र सरकार स्थापन केले आहे. मुख्यमंत्री २५ नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता येथील विमानतळावर येणार आहे.विमानतळावर आगमन झाल्या नंतर तेथुन ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी अभिवादन करणार आहेत.
मुख्यमंत्र्यांसोबतच उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभुराज देसाई, महसुलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, तसेच फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे आणि आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील असणार आहेत.
मुख्यामंत्र्यांच्या हस्ते कऱ्हाड बाजार समिती, शासनाचा कृषी विभाग आणि सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजीत राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन देखील होणार आहे. तसेच त्यांच्या हस्ते कऱ्हाडच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे उदघाटन होईल.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाचवडेश्वर ते कोडोली दरम्यानचा पुल आणि रेठरेच्या पुलाचे भुमीपुजन सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर दुपारी येथील शासकीय विश्रामगृहाचे उदघाटन होईल. यावेळेस माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण देखील उपस्थित राहणार आहेत . त्यानंतर दुपारी तीन वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचा मेळावा होणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम