द पॉईंट प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचा (HSC) निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. या संदर्भातील सर्व तयारी बोर्डाने पूर्ण केली असून केव्हाही तारखा जाहीर होऊ शकतात.याच अनुसंगाने आज बारावीचे बैठक क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून लवकरच बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बारावीचा निकाल 31 जुलै पर्यंत लागणे आवश्यक होतं, पण महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बारावीचा निकाल ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल असे सांगण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा वाट बघावी लागणार आहे. नुकताच केंद्रीय बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून महाराष्ट्र बोर्डाचा निकाल लवकच लागणार आहे.
बारावीचा निकाल जाहीर करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक ऑनलाइन स्वरूपात जाहीर करण्यात आले आहे. हा बैठक क्रमांक विद्यार्थी http://mh-hsc.ac.in या संकेत स्थळाला भेट देऊन बघू शकतात.
आपला बैठक क्रमांक कसा बघायचा बघा सोपी पद्धत
http://mh-hsc.ac.in या संकेत स्थळावर सर्च सीट नंबर वर जा.
यानंतर आत मध्ये तुमचा जिल्हा आणि तुमचा तालुका निवडा
यानंतर तुमचं संपूर्ण आडनाव, विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव याप्रमाणे त्यात नमूद करा.
यानंतर एंटर दाबा आणि तुमचा सीट नंबर तुमच्या समोर येईल
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
maheshgangurde9552@gmail.com
https://thepointnow.in/?p=203
https://thepointnow.in/?p=203