सोमनाथ जगताप | देवळा
नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हा निंबंधक डॉ सतीश खरे यांनी जाहीर केला असून ,त्यानुसार मंगळवार दि १ पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात करण्यात आली आहे. देवळा तालुका संचालक पदासाठी देवळा तालुक्यात रस्सीखेच वाढली असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
तालुक्यात एकूण ४६ मजूर संस्था आहेत .यात फेडरेशनचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक सतीश सोमवंशी हे पुन्हा तालुका संचालक पदासाठी इच्छुक असल्याचे समजते. सोमवंशी हे फेडरेशनचे माजी अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांचे निकटवर्तीय आहेत. तसे असले तरी यावेळेस तालुका संचालक पदासाठी मजूर संस्थांचे इतर सभासद इच्छुक असून ,त्यांनी सभासदांशी सपंर्क साधला आहे . तर विद्यमान संचालकांनी गेल्या सात वर्षात सभासदांशी सपंर्क साधला नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे तालुका संचालक पदासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावली असून , यात कोणची वर्णी लागते .याकडे सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे .
या आधी तालुक्यातुन मजूर फेडरेशनच्या चेअरमन पदी देवळ्यातू केदा आहेर , खर्डे येथील दिलीप पाटील व लोहोणेर येथील सतीश सोमवंशी यांची वर्णी लागली आहे . तत्कालीन अध्यक्ष केदा आहेर हे जिल्हा नेते असून, त्यांनी फेडरेशनवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे . ते ठरवतील त्या सभासदाची तालुका संचालक पदी वर्णी लागणार आहे. मात्र अनेक सभासदांनी नव्या उमेदवाराला संधी मिळावी अशी मागणी केली आहे . संचालक पदी आपली वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी आहेर यांच्याकडे गळ घातली असून, तालुका संचालक पदासाठी उमरण्याचे सुभाष गायकवाड ,वाजगावचे सुनील देवरे यांची नांवे चर्चेत आहेत. यात कोणाला संधी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
खरे चित्र माघारी नंतर स्पष्ट होईल . तालुक्यात एकूण ४६ सभासद आहेत. निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्याने इच्छुकांनी सभासदांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम