पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे राष्ट्रपती पदकाने सन्मानित

0
31

नाशिक : पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले.

पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांना त्यांच्या गुणवत्तापुर्ण सेवेबद्दल २०२० साली स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले होते. पण कोरोना प्रादुर्भावामुळे पदक वितरण समारोह आयोजित करण्यात आला नव्हता. त्यामुळे आज मुंबईत राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे हस्ते डॉ. सिताराम कोल्हे यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले. यावेळी राजभवन येथील सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस महासंचालक रजनीश सेठ व अन्य पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

डॉ. सिताराम कोल्हे यांची १९९१ साली राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली होती. त्यानंतर सन १९९२-९३ मध्ये नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीतून एक वर्षाच्या खडतर प्रशिक्षणानंतर त्यांनी नागपूर लोहमार्ग, नाशिक ग्रामीण विशेष सुरक्षा पथक, जळगाव, गुन्हे अन्वेषण विभाग नाशिक यथे आपले कर्तव्य बजावले आहे. सध्या ते पंचवटी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

आजपर्यंत त्यांच्या तीस वर्षाच्या सेवा कालावधीत अतिशय क्लिष्ट, किचकट असे खून, दरोड्याचे गुन्हे उघडकीस आणून त्यामधील गुन्हेगारास अटक केले आहेत. व त्या गुन्हेगारांचे कौशल्यपुर्ण तपास करत त्यांना न्यायालयातून शिक्षा दिली आहे. त्यांच्या सेवा कालावधीमध्ये आतापर्यंत ७०० हून अधिक बक्षिसे व १२५ हून अधिक प्रंशसापत्रे मिळाली आहेत. तसेच १ मे २०१६ रोजी त्यांना गुणवत्तापुर्ण व उल्लेखनीय सेवेबद्दल राज्य पोलीस महासंचालकांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here