
देवळा ; उद्या गुरुवारी ( २९) रोजी होणाऱ्या टेहरे येथिल रास्तारोको आंदोलनासाठी गिरणा परिसरातील हजारो कांदा उत्पादक शेतकरी सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे ,असे आवाहन कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव यांनी केले आहे .

२९ सप्टेंबर रोजी दुपारी टेहरे ता . मालेगाव येथील हुतात्मा स्मारका जवळ मुंबई आग्रा महामार्गावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विविध मागण्यासाठी विशेषतः अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ भरपाई मिळावी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा ज्यास्तीत ज्यास्त कांदा निर्यात करण्यासाठी सरकारने पाऊले उचलावीत,शेतिमाल निर्यातीसाठी दिर्घ कालीन धोरण जाहीर करावे, सर्वच शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळावा यासाठी क्रुषीमुल्य आयोगाने धोरण जाहीर करावे , इत्यादी मागण्यांसाठी सरकारचं लक्ष वेधून,जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येने टेहरे फाटा येथे उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी अध्यक्षा सिमाताई नलावडे यांनी बुधवारी ( २८) रोजी तालुक्यातील विठेवाडी येथिल संवाद दौऱ्यात व्यक्त केले .
यावेळी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना ज्यास्तित ज्यास्त संख्येने उद्याच्या रास्तारोको आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले, शेतकरी संघटनेचे देवळा तालुका अध्यक्ष माणीक निकम यांनी आभार मानले, यावेळी सर्व शेतकरयांनी हांत उंचावत शेतकरी संघटनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली,या संवाद मेळाव्यासाठी शेकडो शेतकरी,व कांदा उत्पादक उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम