कडू साहेब लई ‘कडू’ वागता ! थेट कार्यकर्त्याच्या लगावली कानशिलात; व्हिडियो समोर

0
14

अमरावती : प्रहर संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू सतत अनेक कारणांनी चर्चेत असतात. कधी त्यांच्या आक्रमक आंदोलनासाठी, तर कधी अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यासाठी. मात्र, त्यामुळे ते अनेकदा वादात सापडले आहे. आता बच्चू कडू यांनी थेट कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली आहे.

झाले असे की, आमदार बच्चू कडू आपल्या अचलपूर मतदारसंघातील गणोजा गावात एका रस्त्याच्या उद्घाटनासाठी गेले. मात्र, येथील रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार येथील आपल्याच पक्षाचा सर्कलप्रमुख सौरभ इंगोले यांनी केल्याने एकच गदारोळ झाला आणि त्यामुळे संतापलेल्या बच्चू कडूंनी पोलिसांसमोर त्याला “तुला काय समजतं” असे म्हणत, थेट त्या कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे बच्चू कडूंच्या अडचणी वाढल्या आहेत. पहा हा व्हिडियो :

हाती आलेल्या माहितीनुसार, कडूंनी कानशिलात लगावलेल्या सौरभ इंगोले हा अनेक दिवसांपासून बच्चू कडू यांच्यासोबत काम करत आहे. तसेच,  इंगोले यांची पत्नी सुद्धा ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत आहेत. मात्र, या घटनेमुळे बच्चू कडू बदलले असल्याची चर्चा रंगली आहे.

त्या व्हिडियोनंतर कडूंनी दिले स्पष्टीकरण 

दरम्यान, हा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर कडू यांनी त्या कार्यकर्त्यासोबत येत आपले स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, की मी त्या कार्यकर्त्याला मारहाण केली नाही, मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याला मी वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला. नंतर त्याला थांब म्हटलो. त्यामुळे याला मारहाण म्हणत नाही. थांब म्हणणे आणि मारहाण करणे यात फरक असतो. तसेच, आमचे कार्यकर्त्यांसोबत कौटुंबिक नाते असल्याचेही कडू यांनी म्हटले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here