दिल्ली – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावर शरद पवार यांची फेरनिवड झाली आहे. दिल्लीत झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवारांची बिनविरोध निवड झाली आहे.
आज @ccoi_1947 येथील विस्तारित राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत आदरणीय @PawarSpeaks साहेब यांची @NCPspeaks च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. आदरणीय साहेबांच्या नेतृत्वात या देशामध्ये पुरोगामी, धर्मनिरपेक्ष सर्वसमावेशक विचारांचा प्रसार करू व भारतीय लोकशाही बळकट करू.
— Ravikant Varpe रविकांत वरपे (@ravikantvarpe) September 10, 2022
रविवारी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडणार आहे. तत्पूर्वी आज दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या अध्यक्षपदाचा ठराव मांडला जाणार होता. त्यात शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड करण्याचा ठराव मांडला व तो एकमताने मंजूर झाला. त्यामुळे शरद पवार पुढील चार वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राहणार आहेत.
यावेळी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना देशात घडणाऱ्या विविध मुद्द्यांवर भाजपवर टीका केली आहे. तसेच, आपल्या कार्यकर्त्यांना लोकांच्या समस्या मांडण्यासाठी ठोस कार्यक्रम घेण्याची मागणी केली आहे. या बैठकीत विविध मुद्द्यांवर अनेक ठराव मांडले गेले. तसेच, पक्षाने यंदाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची जबाबदारी राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी संघटनेकडे दिली गेली.
बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस टी.पी. पीतांबरन, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, के. शर्मा, एस.आर. कोहली यांच्यासह पक्षाचे सर्व खासदार, आमदार व सर्व राज्यांतून आलेले ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम