भाजपचे मिशन लोकसभा : अनेक मोठ्या नेत्यांना दिली मोठी जबाबदारी

0
34

मुंबई – भारतीय जनता पक्षाने आगामी २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रदेश प्रभारींची घोषणा केली आहे. ज्यात पक्षाने अनेक महत्वाच्या नेत्यांना मोठी जबाबदारी दिली आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी विविध राज्यांसाठी पक्षाचे प्रदेश प्रभारी आणि सहप्रभारींची यादी जाहीर केली आहे. ज्यात महाराष्ट्रातून विनोद तावडे व पंकज मुंडे यांची निवड झाली आहे. विनोद तावडे यांना बिहारच्या प्रदेश प्रभारी तर पंकज मुंडे यांना मध्यप्रदेशच्या सहप्रभारीपदाचा कार्यभार दिला आहे. विशेष म्हणजे, ह्या दोन्ही नेत्यांना निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाने कोणतीही जबाबदारी दिली नव्हती. तसेच, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना केरळची तर राष्ट्रीय महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याकडे राजस्थान प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

इतर प्रभारींमध्ये त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब देब यांना हरियाणा, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींना पंजाब-चंदीगड व बिहारचे माजी मंत्री मंगल पांडे यांना पश्चिम बंगालच्या प्रभारीपदी नियुक्त करण्यात आले आहे. तर संबित पात्रा यांना संपूर्ण पूर्वोत्तर राज्यांचे समन्वयक बनवण्यात आले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here