मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या ४ व ५ सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर येत असून ते मुंबईतील विविध मंडळाच्या बाप्प्पांचे दर्शन घेणार आहे. ह्याच दौऱ्यातून भाजपच्या ‘मिशन मुंबई’ला सुरुवात होणार आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या या दौऱ्यात ते लालबागचा राजा, सिद्धिविनायकाचे दर्शन घेतील, तसेच मुंबई भाजपध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरच्या गणपतींचे दर्शन घेणार आहे. याच दौऱ्यात अमित शहांच्या उपस्थितीत भाजप “मिशन मुंबई” महापालिकेचा श्रीगणेशा करणार आहे. या दौऱ्यादरम्यान अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची देखील भेट घेणार आहेत. शिवसेनेत झालेले अभूतपूर्व बंड आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा समजला जात आहे.
अमित शहा २०१७ साली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, तेव्हापासून अमित शहा लालबागच्या राजाच्या दर्शनाला न चुकता येतात. मात्र, गेली दोन वर्षे कोविडमुळे शहांना लालबागच्या राजाचे दर्शन घेता आले नव्हते. मात्र, यंदा गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्याने अमित शहा लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येणार आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम