सत्तातरानंतर प्रथमच मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या भेटीला; घेतले बाप्पाचे दर्शन

0
39

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तातरानंतर प्रथमच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहेत. राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ ह्या नव्या निवासस्थानी पहिल्यांदाच बाप्पाचे आगमन झाले आहे. त्यामुळे बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंच्या निवासस्थानी भेट दिली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, या भेटीत आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला, तसेच मुख्यमंत्र्यांनी ठाकरे कुटुंबियांशी काहीवेळ संवाद साधला. राज ठाकरेंच्या घरी आलेल्या दीड दिवसाच्या बाप्पाचे दर्शनदेखील मुख्यमंत्र्यांनी घेतले. यावेळी शर्मिला ठाकरे, अमित ठाकरेंसोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर उपस्थित होते.

या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, आमची भेट ही राजकीय चर्चांसाठी भेट नसून एक सदिच्छा भेट होती. गणेशोत्सवानिमित्त सगळीकडे एक आनंदाचे वातावरण आपण पाहतो, त्यानिमित्ताने आपण एकमेकांच्या घरी जातो. राज ठाकरे यांचे मागे ऑपरेशन झाले होते, त्यावेळीच मी त्यांना भेटणार होतो. पण आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here