मुंबई – राज्याचे माजीमंत्री आणि शिंदेगटाचे आमदार अब्दुल सत्तार हे शिक्षक पात्रता परीक्षेच्या घोटाळ्यातील आरोपांमुळे चर्चेत आले आहेत. कारण त्यांच्या दोन्ही मुलींची नावे ह्या घोटाळ्यात समोर आली आहे.
राज्य टीईटी परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या यादीत अब्दुल सत्तारांच्या मुली हिना आणि उज्मासह कुटुंबातील ४ मुले परीक्षेत अपात्र ठरल्याचे समोर आले आहे. सर्व अपात्र लोकांनी आरोपी तुकाराम सुपे यांना पात्र होण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप आहे. अब्दुल सत्तार यांनी याप्रकरणी आपल्यावरील केलेले आरोप फेटाळून लावले आहेत, हे बदनामीचे षडयंत्र असल्याचा दावा सत्तार यांनी केला आहे.
आरोप करणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे – अब्दुल सत्तार
माझ्या मुलींनी टीईटी परीक्षा दिली, पण ते पात्र नव्हते. आज अचानक २०२२ ची यादी आली, या वर्षांमध्ये मुली कुठे उत्तीर्ण झाल्या आणि त्यांना काय फायदा झाला ते दर्शवा. माहिती अधिकारांतर्गत कोणीही शिक्षण विभागाकडे वन-टू-वन कागदपत्रे मागू शकतो. माझी मुलगी २०१७ मध्ये माझ्या संस्थेत काम करू लागली. त्याची चौकशी केल्यानंतर तिने परीक्षा दिली व तिला अपात्र ठरवण्यात आले, तिचे प्रमाणपत्र माझ्याकडे आहे. आमची चूक असेल, तर माझ्या मुलींवर कारवाई झाली पाहिजे. पण चूक झाली नसेल, तर ज्यांनी हे आरोप केले त्यांना फासावर लटकवले पाहिजे आणि या आरोपांची चौकशी व्हावी, अशी मागणी सत्तारांनी केली आहे. याप्रकरणी चौकशी करायची झाल्यास शिक्षणाधिकारी उपसंचालक आहेतच.
सत्तार यांच्या मुलींचे प्रमाणपत्र केले रद्द
उज्मा आणि हिना सत्तार यांनी टीईटी परीक्षेच्या प्रमाणपत्रासाठी एजंटला पैसे दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची टीईटी प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेने यादी जाहीर केली. यादीत औरंगाबाद जिल्ह्यातील काही उमेदवारांसह चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या उमेदवारांची नावेही समोर आली आहेत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ मधील गैरवर्तनात सहभागी विद्यार्थ्यांना अपात्र घोषित केले आहे. घोटाळ्यात दोषी आढळलेल्या विद्यार्थ्यांविरुद्ध परिषदेने नोटीस बजावली आहे. त्यानुसार आतापर्यंत ७८०० उमेदवारांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच कारवाई झालेल्या सर्व उमेदवारांना भविष्यात टीईटी परीक्षेला बसण्यासही प्रतिबंध केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम