द पॉईंट नाऊ ब्युरो : एकनाथ शिंदे हे गुवाहाटी येथून निघाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र ते कुठे निघालेत याबाबत निश्चित नव्हते. मात्र ते आता दिल्लीला रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे.
बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे हे 40 हुन अधिक आमदारांसह आधी सुरत आणि नंतर गुवाहाटी येथे थांबले आहेत. आता शिंदे हे दिल्ली येथे रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आता ते दिल्लीत कोणाची भेट घेणार, याबाबत मात्र सांगण्यात आलेले नाही.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर भाजपमध्ये देखील हालचाली सुरू झाल्या होत्या. याबाबत दिल्लीत देखील खलबते झाल्याचे बोलले जात होते. त्यानंतर बराच काळ शांत राहिलेले फडणवीस देखील दिल्लीला गेल्याचे सांगण्यात आले. आता शिंदे हे देखील दिल्लीला निघाल्याचे सांगण्यात येत असल्याने, चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, भाजपने शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची आणि सोबतच्या आमदारांमधून 12 मंत्रीपदांची ऑफर दिल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे एकनाथ शिंदेंची ही दिल्ली वारी भाजपच्या ज्येष्ठ नेते मंडळींच्या भेटीसाठी तर नाही ना, असा सवाल उपस्थित केला जात आहे. आता खरे काय ते चित्र लवकरच स्पष्ट होईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम