द पॉईंट नाऊ ब्युरो : एखाद्या गोष्टीबाबत किंवा व्यक्तीबाबत सर्च करायचं असेल तर सर्वात पहिला पर्याय आहे तो म्हणजे गुगल (Google). जो संपूर्ण जगभरात वापरला जातो. आता यात एकनाथ शिंदे हे पाकिस्तान, बांग्लादेश, सौदी अरेबिया, नेपाळ, मलेशिया या देशांमध्ये गुगल (Google) वर सर्वात जास्त सर्च केले गेल्याचे समोर आले आहे.
गुगलवर मुख्यत्त्वे सेलिब्रिटी, खेळाडू असे लोक सर्वाधिक वेळा सर्च केले जातात. मात्र आता महाराष्ट्रातील सध्याच्या घडीला सर्वाधीक चर्चेत असणारे एकनाथ शिंदे यांच्या बाबत परदेशात देखील मोठी उत्सुकता दिसुन येत आहे. एकनाथ शिंदे यांच्याबाबत बांग्लादेशात (Bangladesh) 41 टक्के, मलेशियात (Malaysia) 60 टक्के, सौदी अरेबियात (UAE) 58 टक्के, थायलंड (Thialand) मध्ये 55 टक्के, जपान (Japan) मध्ये 60 टक्के आणि इतकंच नाही, तर आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान (Pakistan) मध्ये देखील एकनाथ शिंदे हे गुगलवर 55 टक्के इतक्या प्रमाणात सर्च केले गेले आहेत.
भारतात सध्या महाराष्ट्रातील राजकारण शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यामुळे खवळून निघाले आहे. आणि याच एकनाथ शिंदे यांच्याबाबत परदेशात देखील मोठे कुतूहल निर्माण झाल्याचे दिसून आले. जे इतक्या देशांमध्ये गुगलवर सर्च केले गेले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम