द पॉईंट नाऊ ब्युरो : बॉलिवूडचा बादशाह किंग खान अर्थात शाहरुख खानच्या बंगल्याचा करार 1981 सालीच संपल्याचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे. शाहरुखचा ‘मन्नत’ हा बंगला सरकारी जमिनीवर उभा आहे. असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.
मुंबईमध्ये अतिशय मोक्याच्या ठिकाणी असलेला शाहरुख खानचा मन्नत हा बंगला त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठ्या पर्वणीसारखे आहे. कारण या बंगल्याच्या ठिकाणी शाहरुखचे शेकडो चाहते रोजच येत असतात. मात्र हा बंगला सरकारी जमिनीवर उभा आहे. आणि त्याचा करार हा 1981 सालीच संपल्याचा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आरोप केला आहे. परंतु, आजपर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्याने हा करार पुनर्स्थापित केला नाही. कोणत्याही सरकारला जमिनीच्या भाड्याचे पैसे वसूल करता आले नाही. आणि ते वसूल करायला कोणी तयार नाही. असा आरोप जाधव यांनी केला आहे.
जर जमिनीच्या भाड्याचे पैसे वसूल केले, तर महाराष्ट्र करमुक्त होईल. असे जाधव यांनी म्हटले आहे. जाधव यांनी केलेल्या या आरोपांमुळे सर्वांचे डोळे विस्फारले गेले आहेत.
जर शाहरुख खानचा बंगला सरकारी जमिनीवर उभा आहे. तर त्याचे भाडे का वसूल केले नाही? आणि अद्याप पर्यंत कोणत्याही सरकारला याची जाग नव्हती का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र आता हर्षवर्धन जाधव यांनी केलेल्या या आरोपांमध्ये नेमके किती तथ्य आहे? ते नक्की खरे आहेत का? आणि जर खरे असतील तर त्यावर आजपर्यंत काहीच पाऊल कसे उचलले गेले नाही? असे प्रश्न निर्माण होत आहेत.
शाहरुखच्या ‘मन्नत’ या बंगल्याची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. हा बंगलाच इतका अवाढव्य आहे की, त्याला पाहताच कोणालाही भुरळ पडते. शेकडो चाहते शाहरुखला बघायला रोज इथे येत असतात. आणि जाता जाता या बंगल्यासोबत देखील फोटो काढून जातात. मात्र या बंगल्यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम